33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवरील प्रश्नांना उत्तरे देताना सोमय्यांची चांगलीच तारांबळ उडाली

पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवरील प्रश्नांना उत्तरे देताना सोमय्यांची चांगलीच तारांबळ उडाली

टीम लय भारी

अंबाजोगाई : जगमित्र कारखाना प्रकरणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते किरीट सोमैय्यांची पत्रकारांच्या पुढे अक्षरश: तोंडावर पडण्याची वेळ आली आहे(Somaiya scared, While answering the questions). 

भाजपच्या एका आमदाराच्या कारखान्याने 28 हजार शेतकऱ्यांच्या नावे 35 हजार कोटी रुपये कर्ज परस्पर लाटले आणि जेलमधून निवडणूक लढवली, एका माजी मंत्र्यांच्या परळी तालुक्यातील कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीचे कोट्यावधी रुपये बुडवले, कर्मचाऱ्यांनी पगार बुडवले म्हणून आंदोलन केले; नुकताच एका आमदारावर एक हजार कोटींच्या देवस्थान जमीन लाटल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे… अशा गाजलेल्या प्रकरणांवर का बोलत नाही, या घोटाळ्यातील पीडित सामान्य शेतकरी नाहीत का? त्यांना न्याय मिळणार कधी? त्यांचे दुःख तुम्हाला दिसत नाही का?

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

पाताळयंत्री किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

यावेळी किरीट सोमय्या पत्रकरांवर भडकले. तुम्ही पत्रकारासारखे प्रश्न विचारा की, तुम्ही राष्ट्रवादी चे प्रवक्ते असल्यासारखे विचारत आहात… असे म्हणत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. तसेच पत्रकारांनी देखील संधीचा फायदा घेत सोमय्यांवर प्रश्नांचा घडीमार केला. आम्ही पत्रकार आहोत, कोणाचेही प्रवक्ते नाहीत, पत्रकार परिषदेत आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, असे पत्रकारांनी ठासून सांगितले असता, किरीट सोमैय्यांची बोलती बंद झाली.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला खडे बोल सुनावले

BJP leader Kirit Somaiya seeks FIR against civic ward officer

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी