29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाApex Council Election : शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

Apex Council Election : शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी असणारे शरद पवार यांचे क्रिकेटसोबत असणारे नाते जगजाहीर आहे. याआधी शरद पवार यांनी थेट आंतरर्ष्ट्रीय क्रिकेट काऊंसील अर्थात आयसीसीचे अध्यक्षपददेखील भुषवले आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे देखील शरद पवार अध्यक्ष राहिलेले आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील मुंबईमध्ये स्थित असलेल्या वानखेडे क्रिकेट स्टेडियामच्या निवडणुकीच्या लढतीत शरद पवार यांचा गट उतरला आहे. येत्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6च्या दरम्यान वानखेडे स्टोडियम येथे ऍपेक्स काऊंसीलच्या 16 जागांसाठी निवडणनुका आयोजित करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

INDvsSA ODI : धोनीच्या घरात गब्बरसेना गरजणार? संघात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

Election Commission: धनुष्यबाण गेला आता घड्याळ चिन्ह घ्या; मनसेचा सल्ला!

Election Commission: शिवसेना पक्ष कुणाचा फैसलाच करता आला नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका काय?

या निवडणूकांसाठी एकुण 10 पॅनलने अर्ज केलेला आहे. विशेष म्हणजे या निवडणूकांसाठी अर्ज दाखल करण्याची सोमवार (10 ऑक्टोबर) ही शेवटची तारीख आहे. त्यासाठी अद्याप बातमी लिहीपर्यंत विरोधक गट निश्चित करण्यात आलेला नाही. दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीत विरोधी गट निश्चित होऊन 20 ऑक्टोबर रोजी नवडणूका होणे अपेक्षित आहे. या निवडणूकीसाठीच्या अध्यक्षस्थानी माजी दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवाय उपाध्यक्षपदी नवीन शेट्टी तर सचिव पदी अजिंक्य नाईक हे कार्यभार सांभळणार आहेत.

दरम्यान, 31 जुलै 2010 या दिवशी शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेय काऊंसील अर्थात आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला होता. त्यानंतर शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष असतानाच टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 28 वर्षांनंतर आयसीसी वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. विशेष म्हणजे शरद पवारांच्या हस्ते महेंद्रसिंग धोनीला आयसीसी चषक सुपुर्त करण्यात आल्याचा प्रसंग आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कोरलेला आहे. अशा प्रकारे शरद पवार आणि क्रिकेट यांच्यात असलेले घट्ट नाते जगाने अनुभवले आहे. आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानातील निवडणूकीत शरद पवार यांचे नाव पुढे आल्याने अनेकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी