30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
HomeराजकीयShivSena : ‘... तर मग मंत्री कशाच्या आधारावर पदावर राहू शकतात?’ -...

ShivSena : ‘… तर मग मंत्री कशाच्या आधारावर पदावर राहू शकतात?’ – गद्दार म्हणत शिवसेना नेत्याचा सवाल

एक प्रश्न आहे, आता जर शिवसेना हे नाव आणि ज्या चिन्हावर हे गद्दार निवडुण आले, हे जर गोठवले गेले तर मग राज्याचे मंत्री कशाच्या आधारे त्या पदावर राहू शकतात? 

एकनाथ शिदे यांनी शिवसेनेवर दावा सांगत निवडणुक आयोगात धाव घेतली आहे. शनिवारी शिवसेना (पक्ष) आणि धनुष्यबाण (पक्षचिन्ह) याबाबत निवडणुक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान निवडणुक आयोगाने अतंरिम निर्णय देत शिवसेना आणि धनुष्यबाण काहीकाळासाठी गोठवल्याचा निर्णय दिला. त्यामुळे आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाही. दरम्यान निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर आता राजकीय वातावरणात आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झ़डू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांतून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ट्विटरवर प्रतिक्रीया व्यक्त केली असून सरकारमधील मंत्र्यांना सवाल केला आहे.

केदार दिघे म्हणतात ‘‘ एक प्रश्न आहे, आता जर शिवसेना हे नाव आणि ज्या चिन्हावर हे गद्दार निवडुण आले, हे जर गोठवले गेले तर मग राज्याचे मंत्री कशाच्या आधारे त्या पदावर राहू शकतात?  कारण ते आता पक्षाचेही राहिले नाहीत आणि त्यांनी अजून कुठल्या राजकीय पक्षात प्रवेशही केला नाही.’’

 हे सुद्धा वाचा :

Apex Council Election : शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

INDvsSA ODI : धोनीच्या घरात गब्बरसेना गरजणार? संघात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

Election Commission: धनुष्यबाण गेला आता घड्याळ चिन्ह घ्या; मनसेचा सल्ला!

 दरम्यान कालच्या निवडणुक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण दोन्ही कायमचीच गोठवली जाणार का अशा चर्चांना देखील उधाण आले आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मात्र आता पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह घेऊन लढावे लागणार आहे. निवडणुक आयोगाने सोमवारपर्यंत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला आपल्या निवडणुक आयोगाकडे नवे पक्षचिन्ह आणि पक्षासाठी नवे नाव सुचवावे लागणार आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत, पक्षासाठी नवे नाव आणि चिन्ह याबाबत चर्चा केली असून उद्धव ठाकरे यांनी नवे नाव आणि पक्षचिन्ह सुचवले असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षच हायजॅक करायचा असा डाव शिंदे गटाने टाकला होता. यात निवडणुक आयोगाच्या अंतरिम निर्णयामुळे सध्या उद्धव ठाकरे यांना जरी मोठा धक्का मानला जात असला तरी एकनाथ शिंदे गटाला देखील त्याचा विशेष फायदा झाल्याचे दिसत नाही. कारण एकनाथ शिंदे गटाला देखील निवडणुक आयोगाच्या अंतरिम निर्णयामध्ये ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह मिळालेले नसल्यामुळे त्यांची खेळी अयशस्वी ठरली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी