33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIndia-Australia T-20 series: भारत आणि ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी मोहालीमध्ये भिडणार

India-Australia T-20 series: भारत आणि ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी मोहालीमध्ये भिडणार

भारत (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलियाचे (Australian Cricket Team) क्रिकेट संघ आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (T-20 Cricket Series) पहिला सामना मोहालीमधील पंजाब क्रिकेट संघटनेच्या आय. एस. बिंद्रा नामक स्टेडियममध्ये खेळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

भारत (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलियाचे (Australian Cricket Team) क्रिकेट संघ आज तीन सामन्यांच्या टी-20  मालिकेतील (T-20 Cricket Series) पहिला सामना मोहालीमधील पंजाब क्रिकेट संघटनेच्या आय. एस. बिंद्रा नामक स्टेडियममध्ये खेळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेचे उर्वरित दोन सामने 23 व 25 सप्टेंबरला खेळवण्यात येतील. भारत संघाने 2020-2021 साली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. तर 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 असा ‍विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय  मिळवला. सध्या भारतीय क्रिकेट संघ ICC (International Cricket Council) ने जारी केल्या पत्रकानुसार पुरूषांच्या टी-20 प्रकारामध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने नुकत्याचा पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत  न्यूझीलंड संघाविरूद्ध विजय संपादन केला. तर भारताला नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप टी-20 मालिकेमध्ये अंतिम फेरी गाठण्यामध्ये अपयश आले होते.

भारत व ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 प्रकारामध्ये एकूण 23 सामने खेळले आहेत. त्यापैकी 13 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला तर  9 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर वरचढ ठरला. दोन्ही संघामध्ये चांगले फंलदाज व गोलंदाज असल्यामुळे ही मालिका सुद्धा चुरशीची हाेइल यामध्ये कोणतीच शंका नाही.

भारताचा जलद गोलंदाज मोहम्म्द शमीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेमधून वगळण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलिया संघातील मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व मार्कस स्टायनस यांना दुखापत झाल्यामुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा –

Kuno National Park: मोदींनी चित्ते सोडलेल्या कुनो राष्ट्रीय उदयानाच्या जवळील भागात कुपोषण, गरीबीची भीषण समस्या

Niti Ayog and Maharashtra: ‘महाराष्ट्रामध्ये नीती आयोगच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था स्थापन करणार’

Lay Off In OLA : ऐन सणासुदीच्या वेळी ओला कर्मचाऱ्यांवर कोसळले संकट

पंजाब क्रिकेट संघटनेचे आय. एस. बिंद्रा स्टेडियमची खेळपटटी नेहमी फंलदाजाना मदत करते. त्यामुळे आजच्या सामन्यातही तीच स्थिती असण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजाना खेळपटटी थोडी मदत मिळण्याची संभावना आहे. परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याची निवड करणे फायदयाचे ठरू शकते असा क्रिकेट समीक्षकांचा कयास आहे.

भारत व ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-20 सामन्याची सुरूवात संध्याकाळी 7:30 वाजता स्टार स्पोर्टस नेटवर्क व डिस्नी हॉटस्टार वर होईल.

पहिल्या सामन्यासाठी भारताचा संभावित संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंडया, आर. अश्विन,‍ जसप्रित बुमराह, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल व भुवनेश्वर कुमार

पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संभावित संघ –

आरोन फिंच (कर्णधार), जोश इंगलिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मॅथु वेड, पॅट कमिन्स, डॅनियल सम्स, जोश हॅझेलवूड, ऍडम झम्पा व कैन रिचर्डसन

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी