33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईP. L. Deshpande : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी बचाव समितीतर्फे...

P. L. Deshpande : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी बचाव समितीतर्फे सह्यांची मोहीम

पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमी ही रंगकर्मींची असून ती रंगकर्मींसाठीच असायला हवी. या मागणीसाठी येथील ठेकेदाराची मक्तेदारी आणि प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी बचाव समितीतर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.

पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमी ही रंगकर्मींची असून ती रंगकर्मींसाठीच असायला हवी. या मागणीसाठी येथील ठेकेदाराची मक्तेदारी आणि प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी बचाव समितीतर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन ही करण्यात येणार असल्याचे बचाव समितीचे प्रमुख ज्येष्ठ रंगकर्मी अशोक झगडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाअंतर्गत ही समिती काम करणार नसून समितीत केवळ रंगकर्मीं असणार आहेत, असे झगडे यांनी स्पष्ट केले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही रंगकर्मींकरिता उभारण्यात आलेली आहे. असे असतानाही येथे रंगकर्मींकरिता कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. उलट ठेकेदारांच्या फायद्यासाठीच येथील कारभार सुरू आहे. याविरोधात येथील प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्याकडे कित्येकदा तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र ते कोणतीच कारवाई करत नसल्याने आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. नुकतीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील गैरव्यवहार कारभारात लेखी तक्रार करण्यात आलेली आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हॉटेल्स आणि अन्य संस्थाचे कार्यालय असून सर्वांकडून महिना मासिक भाडे शुल्क आकारले जाते. हे भाडे शुल्क वर्षाला कोट्यवधी रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या तालीम हॉल, कॉन्फरन्स हॉल, मिनी थिएटर्स आणि रवींद्र नाट्यमंदिर येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, संगीतांच्या तालीम आणि कार्यक्रमातून महिना लाखोंच्या घरात भाडे शुल्क मिळत असून याद्वारे ही वर्षाला कोट्यवधी रुपये मिळत असतात.

कोट्यवधी रुपये मिळूनही येथे मोठ्याप्रमाणात असुविधा आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमीला 20 वर्षे उलटूनही येथे पिण्याचा पाण्याचा एक नळ नाही. तरीही पिण्याच्या पाण्याचे बिल लाखों रुपये येत आहे. त्यात येथे कंत्राटी पद्धतीने कामकाज चालत असल्याने ठेकेदारांची मक्तेदारी आहे. येथील मुरलीधर बांदेकर नावाचा ठेकेदार स्वतः च्या मनमानीचा कारभार करत आहे. त्याच्याकडून रंगकर्मीना सर्व काही वस्तू भाड्याने घ्याव्या लागतात. त्यात रंगकर्मीनी तालीम वा कार्यक्रम करण्यासाठी बाहेरून एखादी खुर्ची, टेबल वा साऊंड सिस्टीम सोबत लाईट्स, सेट आणि कार्यक्रमाचा बॅनर जरी आणला तरी रॉयल्टीच्या नावावर ठेकेदार बांदेकर पैसे वसूल करतो.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमी ही मराठी रंगकर्मींकरिता उभारण्यात आलेली आहे. रंगकर्मीं वर्षभर येथे करत असलेल्या कार्यक्रमाद्वारे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. असे असूनही मराठी रंगकर्मींना कोणीही विचारात घेत नाही. याचा अनुभव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान मराठी रंगकर्मींना आलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम करण्यासाठी मराठी कलाकारांना अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र मराठी कलाकारांचे अर्ज आल्यावर त्यांना कार्यक्रम करण्यासाठी डावलून दिल्लीतील हिंदी कलाकारांना बोलविण्याचा घाट घालण्यात आला.

हे सुद्धा वाचा

P. L. Deshpande : पु. ल. देशपांडे कला अकादमीतील असुविधा आणि ठेकेदाराच्या मक्तेदारीबद्दल सांस्कृतिक मंत्र्यांकडे तक्रा

VIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

P L Academy Problem : पु. ल. देशपांडे अकादमीत पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, तरीही लाखोंची बिले!

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमी असे नाव असूनही येथे कोणत्याही प्रकारची कला अकादमी गेल्या 20 वर्षात सुरू करण्यात आलेली नाही. याची जरासुद्धा खंत येथील प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांना वाटत नाही. येथील असुविधांबाबत आणि ठेकेदारांच्या मक्तेदारी विरोधात तक्रार करून ही रोकडे कोणतेही कारवाई करत नाही.

त्यामुळे आता येथील ठेकेदाराची मक्तेदारी आणि प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात पु. ल. देशपांडे कला बचाव समिती तर्फे रंगकर्मींची सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही रंगकर्मींची असून ती रंगकर्मींसाठीच असायला हवी, या मागणीसाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी बचाव समितीचे प्रमुख झगडे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी