33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIND VS AUS : 200 पार करूनही भारताच्या हातात पराभवाचा नारळ

IND VS AUS : 200 पार करूनही भारताच्या हातात पराभवाचा नारळ

पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे नियोजित तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आशिया चषकात मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले होते.

टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांचा भारत दौरा निश्चित करण्यात आला होता. यावेळी भारत विरद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यातील नियोजित तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला मंगळवार (ता. 20 सप्टेंबर) पासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे नियोजित तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आशिया चषकात मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले होते. ज्यामध्ये वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह आणि टी20 स्पेशलिस्ट गोलंदाज हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झाले. मात्र, यातील कोणत्याही गोष्टीचा टीम इंडियाला फायदा झाल्याचे दिसून आले नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे विकेट्स लवकर गमावले. त्यानंतर सध्याचा उपकर्णधार केएल राहुल अन् सुर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरत तडफदार फलंदाजी केली. यावेळी केएल राहुलने केवळ 35 चेंडूत 55 तर सूर्यकुमारने 25 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताच्या डावाचा शेवट गोड करण्याचं शिवधनुष्य हार्दिक पंड्याने आपल्या खांद्यावर घेत केवळ 30 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळी केली आणि भारताने 20 षटकांत 208 धावांचा पल्ला गाढला.

पहिल्याच टी20त 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तुफानी खेळीला सुरुवात केली. कर्णधार ऍरॉन फिंचने केवळ 13 चेंडूत 22 धावा करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्याशिवाय सलामीवीर म्हणून पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या कॅनरॉन ग्रीनने 30 चेडूत 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयपथावर नेले. त्यानंतर काही कालावधीसीठी भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले मात्र यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने केवळ 21 चेंडूत 45 धावा करत ऑस्ट्रेलिया संघाला 19.2 षटकात विजय मिळवून दिला.

हे सुद्धा वाचा

India’s Loss to Australia: ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही’ – रोहित शर्मा

India-Australia T-20 series: भारत आणि ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी मोहालीमध्ये भिडणार

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

दरम्यान, संपूर्ण सामन्यात गोलंदाजांची धुलाई होत असताना भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने 4 षटकांत केवळ 17 धावा देत 3 विकट्स घेतल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरॉन ग्रीनला फलंदाजीतील तुफानी 61 धावा आणि गोलंदाजीतील एका विकेटच्या जोरावर सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर)रोजी खेळवला जाईल. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी