33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईSir JJ School of Art : सर जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये...

Sir JJ School of Art : सर जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये कर्नाटक ललित कला अकादमीचे 50 वे कला प्रदर्शन

कर्नाटक ललित कला अकादमी ही एक आहे .या अकादमीला 50 वर्ष पूर्ण झाली व त्यांचे 50 वे कला प्रदर्शन सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्या सहयोगाने सर जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये सुरू झाले आहे. हे प्रदर्शन 24 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्वांसाठी पाहण्यास खुले आहे. या विशेष वार्षिक प्रदर्शनात एकूण 134 एन्ट्री पैकी 84 निवडलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून त्यातील 10 चित्र पारितोषिक पात्र आहेत तसेच 6 चित्र विशेष उल्लेखित आहेत.

कर्नाटक ललित कला अकादमी ही एक आहे .या अकादमीला 50 वर्ष पूर्ण झाली व त्यांचे 50 वे कला प्रदर्शन सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्या सहयोगाने सर जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये सुरू झाले आहे. हे प्रदर्शन 24 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्वांसाठी पाहण्यास खुले आहे. या विशेष वार्षिक प्रदर्शनात एकूण 134 एन्ट्री पैकी 84 निवडलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून त्यातील 10 चित्र पारितोषिक पात्र आहेत तसेच 6 चित्र विशेष उल्लेखित आहेत.

कला अकादमी, कालावंतांसाठीच व्यासपीठ ,कला व कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्माण झालेली संस्था. राष्ट्रीय ललीतकला अकादमी व्यतिरिक्त अगदी मोजक्याच राज्यांमध्ये स्टेट ललित कला अकादमी आहे व त्या पैकी कर्नाटक ललित कला अकादमी ही एक आहे .या अकादमीला 50 वर्ष पूर्ण झाली व त्यांचे 50 वे कला प्रदर्शन सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्या सहयोगाने सर जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये सुरू झाले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्य एकमेकांशी अनेक अंगांनी जोडलेली आहेत. प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र सांस्कृतिक, व भौगोलिक ओळख असते व तिचे प्रतिबिंब हे कलावंतांच्या अभिव्यक्तिमधून होत असते. दृश्य कलेच्या बाबतीत तर कर्नाटकमध्ये सुरू केलेली कला महाविद्यालये ही जेजे मध्ये शिक्षण घेतलेल्या कर्नाटक च्या चित्रकारांनी सुरू केली आहेत. तो कलात्मक संबंध पुन्हा प्रस्थापित व्हावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन जेजे मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

एकाच वेळी अनेक चित्रकारांची विविध शैलीमधील चित्र विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी मिळतात. मूळ चित्र पाहून खूप साऱ्या गोष्टी समजून घेता येतात. कर्नाटक ललित कलेच्या सहयोगाने जेजे मधील विद्यार्थी व अध्यापक यांच्या चित्रांचे प्रदर्शन / कार्यशाळा कर्नाटक मध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध संस्थानच्या सहकार्याने विद्यार्थी व अध्यापक यांच्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम जेजे मध्ये राबविले जातात.

हे सुद्धा वाचा –

IND VS AUS : 200 पार करूनही भारताच्या हातात पराभवाचा नारळ

Mumbai Accident News : ओला चालकाने वाहनांना दिलेल्या धडकेत आठ जण जखमी

Congress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘दोन’ महत्त्वाचे नेते आघाडीवर

चित्रकार सुहास बहुलकर यांचे हस्ते 20 सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या प्रदर्शनामध्ये विविध शैली व माध्यमामध्ये काम केलेल्या कर्नाटक मधील चित्रकारांची चित्र व प्रिंट प्रदर्शित करण्यात आली आहेत. उदघाटन समारोहात डी महेंद्र चेअरमन, चेअरमन ललित कला अकादमी, कर्नाटक, आर चंद्रशेखर, अकादमी रजिस्टर, वेंकटेश, व्ही सविता आणि प्रदीप हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रमेश चव्हाण यांनी केले.

कर्नाटक ललित कला अकादमी ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या विशेष वार्षिक प्रदर्शनात एकूण 134 एन्ट्री पैकी 84 निवडलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून त्यातील 10 चित्र पारितोषिक पात्र आहेत तसेच 6 चित्र विशेष उल्लेखित आहेत.

कलावंत कलारसिक व कला विद्यार्थी यांनी आवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन सर जेजे स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांनी केले आहे. हे प्रदर्शन 24 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्वांसाठी पाहण्यास खुले आहे.

प्रदर्शन स्थळ – सर जेजे स्कुल एफ आर्ट मुख्य हॉल
प्रदर्शनाची वेळ – सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी