30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयत्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला १४ जुलै रोजी मी स्वतः भेट दिली आहे. तेथील विश्वस्त, भाविकांनी आम्हाला देखील विशेष चौकशी समितीमध्ये (एस.आय.टी.) मुद्दे नोंदवायचे असल्याचे सांगितले आहे. असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सभागृहात सर्व धर्म समभावातून प्रथा परंपरेचा केलेला उल्लेख योग्य असला तरी प्रत्येक मंदिराच्या प्रथा परंपरा आहेत. त्यावर सरकारचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे विशेष चौकशी पथकापर्यंत लोकांचे म्हणणे पोहोचले पाहिजे. तिथल्या परंपरांची नोंद यामध्ये यावी. तसेच येथील ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात काही नोंदी आहेत का ते तपासून घ्यावे. असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात प्रवेश करण्याबाबत विशेष चौकशी समिती नेमण्यावरील चर्चेत त्यांचे मत व्यक्त केले.

श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रथा परंपरा संदर्भात उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर योग्य व समर्पक आहे. तसेच त्यांनी वरील मुद्दे विचारात घ्यावेत अशी सूचना त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सदस्य श्री. शशिकांत शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेश करण्यावरून धार्मिक तेढ निर्माण झाल्याप्रकरणी विशेष चौकशी नेमण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे उत्तर देताना सांगितले की, सर्वांनी एकमेकांच्या धर्माबद्दल श्रद्धा ठेवावी. मंदिरातील विश्वस्तांकडून तक्रार आलेली आहे ती नोंदवली गेली असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. तसेच याबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
काही महिन्यापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रथा परंपरा याबाबत राज्यात मोठाच वाद निर्माण झाला होता. मुस्लिम मंदिरात धूप घेऊन जात असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केल्याने हा वाद वाढला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी