30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमनीषा कायंदे गेल्या, आता राहुल कनाल शिंदे गटाच्या वाटेवर.....

मनीषा कायंदे गेल्या, आता राहुल कनाल शिंदे गटाच्या वाटेवर…..

राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला वारंवार धक्के मिळत आहेत. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला होता. ही घटना ताजी असताना आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. माजी पर्यटनमंत्री व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल कनाल उद्या ( 1 जुलै ) रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

राहुल कनाल यांनी ट्विट करत म्हटले की, “दुःख होतंय !!! हे कोणी केले हे चांगले माहीत आहे, पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केले आहे अशा लोकांना न ऐकता काढून टाकणे म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात, पण ज्यांनी रात्रंदिवस काम केले आहे त्यांना नाही. चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है !!!”.

1 जुलै रोजी ठाकरे गट मुंबई महापालिकेविरोधात मोर्चा काढणार आहे. पण त्या आधीच ठाकरे गटाला हा धक्का बसला आहे. राहुल कनाल हे शिंदे गटात प्रवेश असल्यामुळे युवासेनेनं त्यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवसेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे. ठाकरे गटाचा पालिकेविरोधातील मोर्चा तोंडावर असताना कनाल यांनी पक्षाला रामराम ठोकला त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर कनाल यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला होता. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यांनंतर मुंबईसह 15 महापालिकांच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसे हे इनकमिंग वाढत जाणार आहे. पण नव्याने घेतलेल्या मंडळींना सामावून घेण्याचे मोठे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.

हे सुध्दा वाचा:

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम; रेल्वे वाहतूक उशिरा, महामार्गावर वाहतूक कोंडी

नरेंद्र मोदी मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते; नाना पटोले यांची जळजळीत टीका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी