32 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीयशिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार

गेल्या सव्वा वर्षात राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडत भाजपशी संधान साधत मुख्यमंत्री पद पदरात पडून घेतले. २ जुलैमध्ये राष्ट्रवादीचे हेवीवेट मंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी मंडळींना पाठिंबा देत स्वतः सह नऊ आमदारांना मंत्री केले. असे सगळे काही असताना आता काँग्रेस फुटणार असल्याचा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांच्या दाव्यानुसार, विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून महायुतीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाची मालिका संपली नसून आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही यावेळी बोलताना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी वर्तवली आहे.  ‘काँग्रेसमध्येही एक मोठा गट तयार झाला आहे. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाही, त्यांच्याबाबत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच, योग्य आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ही सर्व मंडळी आहेत.’ असे खासदार प्रतापराव जाधव  यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा 

देशात लोकसभा निवडणुकामध्ये कोणाचा बोलबाला; टाईम्स नाऊ -ईटीजीचा सर्वे
आता भिकारीही होणार स्वावलंबी; मिळणार कौशल्य विकासाचे धडे
पुढच्या महिन्यात राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा दावा

जसं शिवसेनेचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा गट महायुतीमध्ये सहभागील झाला. आता काँग्रेसचाही मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार… खासदार तर त्यांच्या नाहीयेत, पण आमदार महायुतीमध्ये नक्की सहभागी होतील. आता नेमका आकडा मला माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार आहे, असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस फुटली तर भाजपला राज्यात मोकळे रान मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी