31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयआताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा - अजित पवार

आताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा – अजित पवार

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची गेल्या काही महिन्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार 40 आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये सामील होणार, अशा बातम्या दिल्या जात होत्या. त्याविषयी विधानभवनात स्वतः माध्यमांपुढे येऊन पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले, माझ्याबद्दल अशा चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. माझ्याबद्दल इतके प्रेम उफाळून येण्याचे काय कारण आहे, हेच मला समजत नाही. यामुळे एकंदरीत अजित पवार यांच्या बाबत होणाऱ्या उलटसुलट चर्चेत खंड पडला होता. मात्र पवारांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

2024 काय, आताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. पण, राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही.

“राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर 2004 मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर.आर. पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते.”अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवरून आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी त्यांची मुलखात पाहिली नाही, मात्र मुख्यमंत्री व्हायला कोणालाही आवडू शकते’, देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘मुख्यमंत्री व्हायला अनेकांना आवडतं. पण सर्वांना ते होता येत नाही’, असं बोलत फडणवीस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या.

हे सुद्धा वाचा: 
Ajit pawar, NCP, Ajit Pawar aspire became Chief Minister right now

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी