35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी

अजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी

राज्याच्या राजकारणातील एक दमदार नाव म्हणजे अजित पवार. राज्यात १९ वर्षात कॉंग्रेस, शिवसेना-भाजपा युतीचे सरकार (पाच वर्षाचा देवेंद्र फडणवीस सरकारचा अपवाद वगळता), नंतर फडणवीस यांचे ८०  तासांचे सरकार असो, महाविकास आघाडीचे सरकार असो, वा आताचे  एकनाथ  शिंदे यांच्या सरकारमध्ये १४ वर्षात अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. राज्यात सध्या शरद पवार यांच्या नंतर अनुभव असलेला नेता म्हणजे अजित पवार. पण या छोट्या पवारांचे दुर्दैव आणि शोकांतिका म्हणजे ते अद्याप मुख्यमंत्री झाले नाहीत. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी २  जुलै २०२३  रोजी राष्ट्रवादीत बंड केले. पण अद्याप त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागत आहे.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या तर काँग्रेसला ६९ जागांवर विजय मिळवता आला. यावेळी काँग्रेस पक्षाला अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे राष्ट्रवादीला तडजोड करत उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. त्यामुळे थोडक्यात अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची संधी हुकली. तेव्हापासून त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. २००४-२००९ या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होतेच, शिवाय त्यांनी  जलसंपदा खाते  सांभाळले. तर २०१० ला त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय वित्त नियोजन व ऊर्जा खाते आले. २०१४  ते २०१८  या काळात देवेंद्र  फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी बनवून सत्तेत येण्याच्या हालचालीत होते. त्यादरम्यान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करून राज्यपालांकडून पहाटेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा अजित पवारांच्या राजकीय खेळीचा भाग आहे. हा पहाटेचा शपथविधी भाजप सरकारसोबत त्यांचा जाण्याचा निर्णय होता.

पण, अजित पवारांनी पक्षश्रेष्ठी व त्यांचे काका शरद पवार यांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये देखील अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला.अजित पवारांनी २ जुलै,२०२३ रोजी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

हे सुद्धा वाचा
लोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण
आपल्या अपंग फॅनचं प्रेम पाहून शाहरुखही भारवला!
पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने दिली अनोखी भेट
वास्तविक  पाहता  अजित पवार  हे  भाजपाबरोबर  आले  तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवण्यात आल्याचे बोलले  जाते. पण  राज्याच्या  सत्तासंघर्षात  काहीही  होऊ शकते. त्यामुळेच  की  काय अजित पावर यांना येत्या काळात चान्स मिळू शकतो असा आशावाद  त्यांचे  कार्यकर्ते, पदाधिकारी यांना वाटत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी