33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रइतिहास शेतीचा

इतिहास शेतीचा

(सरला भिरुड) (भाग -३)

जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात लागला. अर्थात प्रत्यक्ष शेतीला सुरवात करण्याआधीही माणूस (खरेतर स्त्रिया) त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून त्यातील खाद्ययोग्य अन्नाचे व विशेषत: बियाणांचे निरीक्षण करीत होता.

दहा हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात झाली असे पुरातत्विय पुरावे सांगतात. शेती आणि शिकार, अन्न गोळा करून उपजीविका करणारे समाज नदीकाठी स्थिर जिवन जगून अतिरिक्त उत्पन्न काढत शेती-व्यापार असे दुहेरी व्यवस्था झाली आणि हळूहळू व्यापारी व नियमित करणारे अधिकारी वर्ग तसेच पुरोहित वर्ग निर्माण झाले. सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट केली तर प्राचीन सिंधू संस्कृती पासून भारतीय सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा आधार ही शेती व्यवस्था होती आणि तो कणा होता हे लक्षात येते.

कृषी व्यवस्थेने स्थिर व नागरिक कृषी जीवनाची परंपरा निर्माण केली आणि ही परंपरा नसलेल्या पशुपालक भटक्या टोळ्यांनी या संस्कृतीतील शहरे लुटून गावे उध्वस्त करून त्याला धरणे, नगरे तोडून कृषी व्यवस्थित कसा हादरा दिला याचे संदर्भ वैदिक साहित्यात येतात. वर्णव्यवस्था आणि अठरापगड जातीची  समाजरचना असल्याने शेती व्यवसायाची म्हणजे हाताने काम करणारे सारे क्षुद्र यामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा लयास गेली आणि शेतकरी समाज हा कसा शूद्रवर्णीय होता आणि गुलामगिरीच्या खाईत लोटला गेला हे लक्षात येते.

जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात लागला. अर्थात प्रत्यक्ष शेतीला सुरवात करण्याआधीही माणूस (खरे तर स्त्रिया) त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून त्यातील खाद्ययोग्य अन्नाचे व विशेषत: बियाणांचे निरीक्षण करीत होता.

पोषणमूल्य असलेली बियाणे राखून ठेवून ती दुसर्‍या वर्षीच्या हंगामात पेरता येऊ शकतात व एका बियाणाच्या पेरणीतून उगवलेल्या ताटातून कापणी किंवा तोडणीनंतर कितीतरी जास्त बियाणे गोळा करता येतात हे समजल्यावर शेतीतील अन्ननिर्मितीचे तंत्रच त्याच्या हाती आले. सुरवातीच्या काळात शेतीतंत्र हे अतिशय प्राथमिक अवस्थेत होते. हातानेच शेताची मशागत, पेरणी व इतर कामे व्हायची. पुढे गुरांच्या मदतीने शेती व्हायला लागली.

सुरवातीच्या काळात गवतांच्या काही जातींमधून गव्हाचे ऐमर व आईन कॉर्न हे दोन प्रकार व जव असे धान्यप्रकार तर काही मसुरीसारख्या डाळींचे प्रकार शोधण्यात आले. त्यांची लागवड होऊन त्यांचा अन्न म्हणून उपयोग होऊ लागला. या सोबतच जवस व वाटाणे या पिकांचाही या प्रदेशात शोध लागला याच भागात पशुपालनाचा (बकरी व मेंढी) शोध लागल्यानंतर दूधजन्य पदार्थांचाही अन्नात अंतर्भाव झाला. मध्यपूर्वेतील या प्रदेशाकडून शेतीचा प्रसार हळूहळू उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, भूमध्यसागरीय प्रदेशातील देश, आशिया खंडातील इतर देश आणि युरोपमध्ये झाला.

मध्यपूर्वेतील शोधानंतर भारतात ही शेतीपद्धती जवळपास ३५०० वर्षानंतर पोचली असे मानले जाते. म्हणजे भारतीय शेतीला किमान ६५०० वर्षांचा इतिहास आहे असे समजण्यास हरकत नाही. निकोलाय व्हॅव्हिलॉव्ह या रशियन वनस्पती शास्त्रज्ञानुसार जगात पिकांची जी मुख्य आठ स्वतंत्र उगमस्थाने आहेत त्यात भारत-म्यानमार हा प्रदेश (भारताचा पश्चिमोत्तर भाग सोडून) देखील एक आहे.

या प्रदेशात ज्यांची लागवड केली जात होती अशा ज्या ११७ वनस्पतींची व्हॅव्हिलॉव्हने नोंद केली त्यात तांदूळ, तूर, मूग, उडीद, चणा, चवळी ही तृणवर्गीय कडधान्ये; वांगे, मुळा, काकडी यासारख्या भाज्या; आंबा, चिंच, संत्री, लिंबू यासारखी फळवर्गीय पिके व याशिवाय ऊस, कापूस, तीळ, करडई, ज्यूट, ताग, काळे मिरे, दालचिनी, नीळ यासारखी विविध प्रकारची महत्वाची पिके आहेत.
     भारतीय शेतीची व्यवस्था 
भारतीय शेतीचे १. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा काटक बियाणांचा वापर २. मातीचे स्वास्थ टिकवून ठेवणे आणि ३. शेतीतील जैवविविधता असे तीन मुख्य आधार होते. या मजबूत पायावरच भारतीय शेती गेली साडेसहा हजार वर्षे टिकून राहिली. शेतीतील शाश्वतता टिकून राहण्यासाठी इतर नैसर्गिक संसाधनांचे – जसे पाणी, माती व जंगले यांचे जतन करणे गरजेचे आहे याची ग्रामस्थांना जाणीव होती व तसे करण्याची परंपरा होती. जंगलांचा शेती उत्पादनासाठी असलेला संबंध माहीत असल्यामुळे ‘ग्रामवनाची’ निगा राखण्याची जबाबदारीही गावकर्‍यांची असायची.

दक्षिण भारतात महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात देखील गावपातळीवर तलाव राखले  जाऊन त्यातून शेतीसाठी पाटाने पाणी देण्याची व्यवस्था होती. दर उन्हाळ्यात हंगाम संपल्यानंतर या तलावातील गाळ काढणे व त्या सुपीक मातीचा शेतात वापर करणे किंवा या तलावांच्या भिंतींची डागडुजी करणे ही कामे सामूहिक पद्धतीने केली जायची. जिथे फक्त कोरडवाहू शेतीच होऊ शकत होती अशाही ठिकाणी शेताभोवती झाडांच्या भिंती उभारून, म्हणजेच एक प्रकारे हवेतील आर्द्रता वाढवून, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याची पद्धत होती. अशा कोरडवाहू जमिनीत तसेच कमी पावसाच्या क्षेत्रात कोणती पिके घ्यावीत याचेही शास्त्र होते.

पिकांचा फेरपालट व मिश्रपीक पद्धतीचा वापर हा अनुभवजन्य होता. त्यामुळेच इंग्रज या देशात येऊन शेती व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याआधीच्या काळापर्यंत शेतीची उत्पादकताही बरीच जास्त होती. डॉ. धर्मपाल या इतिहासकारांनी त्या काळातील भात व गव्हाच्या उत्पादनाचे आकडे दिले आहेत. उदारणार्थ, अलाहाबाद जिल्ह्यातील गव्हाचे उत्पादन ४ टन प्रति हेक्टरी तर मद्रास प्रेसिडेन्सीमधील धानाचे उत्पादन ६ टन प्रति हेक्टरी असल्याचा उल्लेख आहे. दुष्काळी वर्षांवर मात करण्याची सामाजिक व्यवस्था होती.
हे सुद्धा वाचा 
लोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण
शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक
कुणाला मिळेल शिवसेना पक्ष आणि चिन्ह….

त्यात गावपातळीवर ‘पेवासारखी’ अडचणीच्या काळात मदतीला येईल अशी धान्य साठवणुकीची व्यवस्था होती. तसेच राज्यकर्त्यांकडून शेतकर्‍यांना दुष्काळी वर्षांत बियाणे पुरविण्याची आणि गरीब गरजू जनतेला दुष्काळी कामे काढून अन्न पुरविण्याची पद्धत होती. म्हणूनच इंग्रजांची राजवट सुरु होण्याआधीच्या जवळपास २ हजार वर्षांच्या काळात २२ मोठे दुष्काळ देशात येऊन गेले तरी फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याच्या नोंदी आपल्या इतिहासात दिसत नाहीत.

(लेखिका समकालीन विषयांच्या अभ्यासक आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी