33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण

लोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात पहिली आणि ऐतीहासिक घोषणा करत महिला आरक्षण कायदा विधेयकाला मंजूरी दिली आहे. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनातील कामकाजास सुरुवात झाली. नव्या संसद भवनात खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर शिक्कामोर्तब करत महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचे विधेयक मांडण्याची घोषणा केली. सोमवारी, 18 सप्टेंबर रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अटलजींच्या काळात अनेक वेळ महिला आरक्षण विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला होता पण डेटा उपलब्ध नसल्याने हे विधेयक येऊ शकले नाही. अटलजींचे स्वप्न यामुळे आधुरे राहिले,” मोदी म्हणाले.

“महिलांच सक्षमीकरण आणि त्यांच्या शक्तीला आकार देण्याच काम करण्यासाठी देवाने मला निवडल आहे,” असे उद्गार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काढले.

पंतप्रधान मोदी यांनी महिला आरक्षण कायद्याला ‘नारी शक्ति वंदन कायदा’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले.

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत उद्या बुधवार, (20 सप्टेंबर) चर्चा होणार आहे. हे विधेयक पारित झाल्यास लोकसभेत महिलांसाठी एकूण 181 जागा आरक्षित असतील. कायदेमंत्री अर्जुन मेघवाल यांनी हे विधेयक सादर केले असून या महिला आरक्षण विधेयकाचा कालावधी 15 वर्षांचा असेल.

केंद्र सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे एक विशेष पाच दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. सोमवारी, (18 सप्टेंबर) संसदेच्या जुन्या इमारतीत अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला असून आजपासून, मंगळवार (19 सप्टेंबर) संसदेच्या नव्या इमारतीत संसदेचे कामकाज पहिले जाईल. ह्या विशेष अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल हे केंद्र सरकारद्वारे स्पष्ट करण्यात आले नव्हते. पण आता नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर महिला आरक्षण कायद्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक याबाबतीत घेण्यात आली होती.

हे ही वाचा 

‘महिला आरक्षण विधेयक’ आज लोकसभेत मंजूर होणार? महिलांना मिळणार 33% आरक्षण!

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!

पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने दिली अनोखी भेट

महिला आरक्षणाला यापूर्वीच काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे संसदेमध्ये या विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग सुकर असल्याचे समजले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी