राजकीय

हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा बगलबच्चा आहे?; अजित पवार संतापले

नागपूरच्या आमदार निवासाची (Nagpur MLA residence) आवस्था म्हणजे फक्त एन्ट्रीला मेकअप आणि आत रुम खराब अशी आहे. जेवण खराब मिळत आहे, कुठे ड्रेनेज तुंबलय अशी परिस्थिती असताना आमदार निवासमध्ये स्वच्छतागृहात चहाचे कप आणि भांडी धुण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. करोडो रुपयांचे कॉट्रॅक्ट घेतले असताना, हा कसला नालायकपणा सुरु आहे. कुठं हे पाप फेडतील ? हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा बगलबच्चा आहे ? असा संतप्त सवाल करत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दोन वर्षाच्या खंडानंतर नागपूरमध्ये अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातून आमदार या अधिवेशनासाठी आले आहेत. आमदार ज्या ठिकाणी थांबतात त्या आमदार निवासाची व्यवस्था म्हणजे फक्त एन्ट्रीला मेकअप आणि आत रुम एकदम खराब आहेत. या आमदार निवास मधील स्वच्छतागृहात चहाचे कप आणि भांडी धुतली जात आहेत. विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी याबाबतचा व्हिडीओ व्टीट केल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच अनेक माध्यमांनी सुध्दा याची दखल घेतली आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.

हे सुद्धा वाचा

अब्दुल सत्तारांकडून कृषी अधिकाऱ्यांची सालगड्यागत अवस्था; संपूर्ण कृषी खाते कृषिमंत्र्यांच्या दावणीला!

चीन मध्ये कोरोना रुग्णांना कारमध्ये अॅडमीट करण्याची वेळ; राज्य सरकारने काय खबरदारी घेतली आहे?

जयंत पाटील यांचे निलंबन; विरोधी पक्षांचा सभात्याग

या व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचे कॉट्रॅक्ट दिले जाते. तरीही असे गैरप्रकार सुरु आहेत. पोलीसांना सुध्दा पहिल्या दिवशी जेवण मिळाले नाही. ते किती तास ड्युटी करतात हे कोणाला माहित नाही. सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल करत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

प्रदीप माळी

Recent Posts

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

1 hour ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

17 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

17 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

18 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

18 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

20 hours ago