35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअजित पवारांचा यू-टर्न कोणासाठी?

अजित पवारांचा यू-टर्न कोणासाठी?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीसाठी बालगीतांचे पठण केले आहे. नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करून भाजपने 2014 च्या निवडणुकीत बहुमताने सत्तेवर येऊन प्रत्येक राज्यात आपली पकड मजबूत केली, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीसाठी बालगीतांचे पठण केले आहे. नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करून भाजपने 2014 च्या निवडणुकीत बहुमताने सत्तेवर येऊन प्रत्येक राज्यात आपली पकड मजबूत केली, असे ते म्हणाले. ईव्हीएमला दोष देणे चुकीचे आहे. इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) विश्वासार्ह असून या मशिनशी कोणीही छेडछाड करू शकत नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शुक्रवारी अजित पवार आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी हडपसर भागात जाण्यासाठी निघाले असतानाच वाटेत शरद पवार यांचा फोन आला… अन् त्यांनी सोबत असलेल्या सहकाऱ्यांना सोडून यू टर्न घेतला, त्यानंतर ते कुठे गेले त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यांच्या नॉट रिचेबल असण्याचे कारण शनिवारी सकाळी त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत दिले. मात्र त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने राजकीय भाकितांना पुन्हा ऊत आला.

पवार म्हणाले की, जे राजकीय पक्ष निवडणुकीत पराभूत होतात ते अनेकदा त्यांच्या कामगिरीसाठी ईव्हीएमला दोष देतात, परंतु त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की निवडणुकीतील पराभव हा जनादेश आहे. ईव्हीएमला ‘क्लीन चिट’ देण्याच्या काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) एका ज्येष्ठ नेत्याने 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याला दिले होते आणि देशात पंतप्रधानांची शैक्षणिक पदवी उच्च महागाई असल्याचे म्हटले होते. आणि तरुणांसाठी रोजगार हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.

पुढे ते म्हणाले की, माझा ईव्हीएमवर विश्वास आहे. एकटा व्यक्ती ईव्हीएममध्ये छेडछाड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे आणि त्यात अनेक स्तर असतात. निवडणुकीत पराभवाला सामोरे जाणारे पक्ष मतदान यंत्राला दोष देत असले तरी निवडणुकीचा निकाल हा जनादेश आहे, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुण्यातील दुसऱ्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना आणखी एक धक्का दिला. तुम्हाला काय वाटते याच्याशी मला देणे-घेणे नाही. ज्या पक्षाचे दोनच खासदार होते, तो पक्ष आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेली नऊ वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. आज जगभर त्यांचा पक्ष पोहोचला हा करिश्मा मोदी यांचाच आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि वेगवेगळी भाकिते रचण्यास सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा: 

माध्यमांनी कंडया पिकवू नये ! अजित पवारांची नाराजी

अजितदादा गायब, 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना ऊत

चक्क अजितदादांनी घेतली मोदींची बाजू; नेमकं प्रकरण काय?

मीडियावर नाराजी?
पवार हे पुणे दौऱ्यावर असताना अचानक दौरा रद्द करून आणि पोलिस संरक्षण सोडून ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवरही झळकल्या. मात्र स्वतः अजित पवार यांनी आपल्याला पित्ताचा त्रास झाल्याचे कारण पत्रकार परिषदेत सांगितले. शनिवारी सकाळी आठ वाजता पवार यांनी खराडीतील एका कार्यक्रमास हजेरी लावली. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘नॉट रिचेबल’ होण्याचे कारण स्पष्ट केले. दरम्यान माध्यमांनी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे विनाकारण आपली बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

Ajit Pawar, Narendra Modi, Ajit Pawar praises Narendra Modi for lok sabha elections no shortage evm

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी