29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईममुंबईत 3 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला ATS कडून अटक

मुंबईत 3 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला ATS कडून अटक

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईवर हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. यातच यासीन सय्यद नावाच्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांना एक फोन आला. त्याने शुक्रवारी पहाटे तीन दहशतवादी मुंबईत घुसल्याची माहिती पोलिसांना दिली. या दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याची माहितीही त्या व्यक्तीने दिली. त्यामुळे मुंबई पोलिस दक्ष झाले होते. विशेष म्हणजे मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच कडेकोट असतो. मात्र दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर धार्मिक स्थळांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही कडक करण्यात आली होती. मात्र ATS ने संपूर्ण शहानिशा करून, या घटनेची खोटी माहिती देणाऱ्या यासीन सय्यद नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्याला पुढील तपासासाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता. त्यावरून दुबईहून पाकिस्तानशी संबंध असलेले तीन दहशतवादी मुंबईत आल्याची दिली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की हा एक खोटा कॉल होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्थानकात आयपीसीच्या 505(1), 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला होता.

मुंबईमध्ये तीन अतिरेकी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मुंबई पोलिसांनी या कॉलची दखल घेत मुंबईत हाय अलर्ट जारी करत शहरातील बंदोबस्तात वाढ केली होती. तसेच या कॉलची माहिती राज्यातील आणि केंद्रातील गुप्तचर व तपास यंत्रणांना देत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले असून कॉल करणाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॉलरचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा: 

खलिस्तानवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापारी एनआयएच्या जाळ्यात

मुंबईत पुन्हा २६/११ घडविण्यासाठी पाकिस्तानचा हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल

Whatsapp Features : व्हॉट्सऍपवरील आपत्तिजनक फोटो, व्हिडिओ असे करू शकता ब्लॉक

ATS, Yasin Syed, fraudulent calls to Mumbai Police, ATS arrests Yasin Syed who made fraudulent calls to Mumbai Police

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी