30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयचक्क अजितदादांनी घेतली मोदींची बाजू; नेमकं प्रकरण काय?

चक्क अजितदादांनी घेतली मोदींची बाजू; नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पदवीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाची टोलेबाजी सुरू केली असतानाच लोकांनी 2014 मोदी यांना पदवी बघून निवडून दिले होते का, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदवीचा विषय उकरून काढणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. पदवीच्या मुद्दयावर मोदींवर टीका करण्यात येत असतानाच अजितदादांनी मोदींची बाजू घेतल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची पहिली एकत्रित जाहीर ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात केला. त्यांनी, अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर 25 हजारांचा दंड बसतो अशी टीका केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात हा जोरदार चर्चेचा विषय ठरला आणि पंतप्रधान मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर विरोधकांकडून जोरदार हल्ला चढवण्यात आला.

चक्क अजितदादांनी घेतली मोदींची बाजू; नेमकं प्रकरण काय?
फोटो सौजन्न- ट्विटर : महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा. प्रतिमेत मविआ नेते आणि (शिवसेना, ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने निवडून दिले. त्यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. भाजपची काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ताकद वाढली त्याचे सारे श्रेय मोदी यांना दिले पाहिजे, असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रविवारी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पदवीवरून मोदी व भाजपला टोला लगावला होता. पण अजित पवार यांनी मोदी यांची बाजू उचलून धरल्याने त्यांच्या मनात नेमके काय आहे, याचा अंदाज येत नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गट व काँग्रेसच्या गटातून व्यक्त करण्यात येत आहे.

मोदी गेली नऊ वर्षे पंतप्रधान आहेत आणि आता पदवीचे प्रकरण काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही. सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजारांची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे पदवी या विषयाला फार महत्त्व द्यावे असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले. सत्ता आहे मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात कसला मुहूर्त बघताय, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा:

ज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल लढणार पीएम मोदींची केस; नेमकं प्रकरण काय?

शिंदे-फडणवीस सरकार कृषि खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकलंय; अजित पवार यांचा घणाघात

एकनाथ शिंदेची बाजू सावरुन घ्यायला शंभूराज देसाई आले; अजित पवारांनी दाखवला रुद्रावतार

Ajit pawar took Modi’s side; What exactly is the case?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी