30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रआता हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचा डोळा!

आता हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचा डोळा!

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील जवळचे सहकारी आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.

महाराष्ट्र साखर कारखानदारीप्रकरणी पुण्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे जवळचे सहकारी आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापेमारी करत आहे. दरम्यान ईडीने जानेवारीमध्ये मुश्रीफ यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडतीही घेतली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने सुरू केलेल्या चौकशी आणि त्यांना बजावलेल्या समन्सला आव्हान देत, ही बेकायदेशीर कारवाई तातडीने रोखण्याचे निर्देश उच्च न्यायालयातर्फे देण्यात आले होते. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलयाने मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. उद्या (बुधवार, 5 एप्रिल) साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हसन मुश्रीफ यांचे सहकारी चंद्रकांत गायकवाड यांना  चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहेत.

विशेषतः ईडीच्या मुंबईतील पथकाने सोमवारी पुण्यातील प्रभात रोड, सॅलिसबरी पार्क, हडपसर, गणेश पेठ आणि सिंहगड रस्ता यासह नऊ ठिकाणी छापे टाकले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स फसवणूकप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, व्यावसायिक विवेक गव्हाणे आणि सनदी लेखापाल जयेश दुधेडिया यांच्या कार्यालयातील कागदपत्रे तपासण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईडीने यापूर्वीही जानेवारी महिन्यात गायकवाड यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकले होते. त्या वेळी त्यांच्या कार्यालयातून काही कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.

महाराष्ट्र साखर कारखाना प्रकरण
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 40 हजार शेतकरी सभासदच नाहीत. केवळ हसन मुश्रीफ, त्यांचे कुटुंबीय आणि कंपन्या अशा 17 व्यक्तीच मालक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जिल्ह्याध्यक्ष समरजीत घाडगे यांनी केला. 40 हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन तब्बल 40 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप घाडगे यांनी केला. या फसवणूकप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मुश्रीफ (६८) हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. भाजप नेते किरीट सोमिया यांनी 2021 मध्ये माजी ग्रामीण विकास मंत्री (मुश्रीफ) यांच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्य आणि कंपन्यांच्या माध्यमातून ‘बेनामी’ संस्था धारण करून भ्रष्ट व्यवहारात गुंतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने हे आरोप फेटाळून लावले होते.

हे सुद्धा वाचा:

हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण

ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक; दोन महिन्यात तिसऱ्यांदा टाकली धाड

हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ईडीला दिले ‘हे’ निर्देश

ED summons Hasan Mushrif’s relatives!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी