30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांना व्हायचेय मुख्यमंत्री; कावळा बसायची आणि फांदी तुटायची वाट भाजपा पाहतेय

अजित पवारांना व्हायचेय मुख्यमंत्री; कावळा बसायची आणि फांदी तुटायची वाट भाजपा पाहतेय

अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपून राहिली नाही. मला मनापासून वाटते मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटले तर प्रमुखपद लागते, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून, ‘भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर’ असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा खरा ठरणार असे वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात आणखी एक राजकीय नाटक रंगण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास एकनाथ शिदे यांचे राजकीय भवितव्य अधांतरीच राहणार आहे. नव्हे तर त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदार आणि खासदार मंडळींना एक तर भाजपातून निवडणूक लढवावी लागेल किंवा विजयी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

अजित पवार यांनी आमदारांसह इतर राज्याचे पर्यटन न करता शरद पवार यांना ४४० वोल्टचा झटका दिला होता. शिंदे गटातील १६ आमदारांच्या आपात्रतेची टांगती तलवार दूर करण्यासाठी मोठ्या पवार यांनी काहीसे दूर केलेल्या अजित पवार यांना भाजपच्या दिल्लीश्वरांनी बरोबर हेरत, आगामी मुख्यमंत्र्याची तजवीज करण्याचा बी प्लान तयार केला. त्यानुसार रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतलीही. तिथेच अजित पवार यांनी व्यवहार चातुर्य दाखवले होते. आता फक्त कावळा बसायला आणि फांदी तुटायची वाट भाजपा पाहत आहे.
2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले. मी खोटं नाही बोलणार… खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले.. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो… माझं तर रेकॉर्ड झाले, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र देशभरात सर्वच पातळीत पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे. मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी कमी आहोत का? असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित व्यक्त केली. मला चार वेळा उपमुख्यमंत्री केले आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले, मला पण मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

प्रतिभाताई पवार आत्मचरित्र लिहितील का ?

रिषभ पंतनंतर या भारतीय माजी वेगवान गोलंदाजाचा अपघात, मुलगाही जखमी

छगन भुजबळांच्या टीकेला जयंत पाटलांचे तोडीसतोड उत्तर

अनेकदा मी माघार घेतली. मी टीका सहन केली. अनेकदा मी अपमान सहन केले. पण मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला. 2019 मध्ये भाजपसोबत पाच बैठका झाल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे. दरम्यान, भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. भाजपकडून काँग्रेस पक्षही फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चव्हाणांनी केला होता. आमच्या माहितीनुसार, सभापतींच्या निर्णयाच्या मदतीने (शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर) एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाईल आणि मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अशाच पद्धतीने भाष्य केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी