28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरराजकीय'शरद पवार जिथे सभा घेतील तिथे...' अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे…’ अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

राज्यात वर्षभरापासून राजकारणाला एक वेगळं वळण मिळत आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. वर्षभरानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 आमदारांसह भाजप आणि शिंदे गटासह हात मिळवणी केली. यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षातही दोन गट तयार झाले आहेत. यामुळे आता शरद पवारांनी ठिकठिकाणी जाऊन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शरद पवार ज्या ठिकाणी सभा घेतील त्या ठिकाणी अजित पवार उत्तर सभा घेणार का? याबाबत आता अजित पवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे. आमदारांच्या मतदारसंघात अधिक लक्ष ठेवणार असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे शरद पवारांना सोडून गेले आहेत. या निषेधार्थ शरद पवार आता राज्यातील ठिकठिकाणी भागात जाऊन सभा घेणार आहेत. शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार कशा पद्धतींने प्रत्युत्तर देतील याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. मात्र अजित पवारांनी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. अजित पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी शरद पवार सभा घेतील त्या ठिकाणी आम्ही उत्तर सभा घेणार नाही. आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र यावेळी त्यांनी उत्तरसभा घेण्यासाठी नकार दिला आहे.

हेही वाचा 

समीर भुजबळांचा ‘मनाचा मोठेपणा’

अन्न व औषध प्रशासन विभागातील पदे पुनर्जीवित करणार, आत्राम यांचे निर्देश

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सव्वा वर्षात, सव्वाशे कोटींचे अर्थसहाय्य

अजित पवारांच्या आतापर्यंत झालेल्या उत्तर सभा 

यापूर्वी राज्यातील काही भागात अजित पवार यांनी उत्तर सभा घेतल्या होत्या. मात्र आता राज्यातील मतदार हा पक्षासाठी जोडायचा आहे. मंत्र्यांनी आमदारांची कामे देखील लवकर करून द्यावी याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी येवला, कोल्हापूर, नाशिक, बीड, जळगाव या ठिकाणी जाऊन शरद पवारांनी सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभेनंतर अजित पवार यांनी उत्तरसभा घेतल्या होत्या. मात्र आता सभा न घेता संघटना मजबूत करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी