34 C
Mumbai
Thursday, November 23, 2023
घरमंत्रालयअन्न व औषध प्रशासन विभागातील पदे पुनर्जीवित करणार, आत्राम यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासन विभागातील पदे पुनर्जीवित करणार, आत्राम यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी (9 ऑक्टोबर) मंत्रालयात आढवा घेतला. अन्न व औषध प्रशासन विभागातील रखडलेली कामे तातडीने करावीत, असे निर्देश आत्राम यांनी यावेळी दिले होते. सध्या राज्यात भेसळ दुग्धजन्य पदार्थांची निर्मीती होत असल्याने याचा विपरीत परिणाम होताे. पंचतारांकीत हॉटेल असले तरीही त्या ठिकाणी किटक, झुरळे अढळतात. यामुळे आजार वाढण्याची भिती आधिक असते. याबाबत धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा घेतला. त्याचप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची पदभरती, लिपिक टंकलेखक आणि नमुना सहाय्यक ही पदे रद्द करण्यात आली होती. ही पदे पुनर्जीवित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आत्राम यांनी सांगितलं.

काय म्हणाले आत्राम?  

अन्न व औषध प्रशासन विभागातील पदभरतीबाबत आत्राम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागातील पदभरती ही टप्याटप्याने करण्यात येईल. मागील वर्षभरात भेसळयुक्त अन्नपदार्थाची दखल घेऊन तेथे छापे टाकून कारवाई करण्यात आली. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. तालुका पातळीवर प्रशासनाच्या अन्न विभागासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे वाढवण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे आत्राम म्हणाले आहेत.

हेही वाचा

भाजपची ‘निवडणूक’ आघाडी, राजस्थान, मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या याद्या जाहीर

टोलनाक्यांवरून राज ठाकरेंकडून फडणवीसांची ‘नाकाबंदी’

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश, वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी 287 कोटी !

लिपिक टंकलेखक आणि नमुना सहाय्यक पदे पुनर्जीवित करण्यात येणार

लिपिक टंकलेखक आणि नमुना सहाय्यक ही पदे रद्द करण्यात आली होती ही पदे पुनर्जीवित करण्याबाबत कार्यवाही करावी, अन्न व औषध प्रशासन बाह्यसंपर्क व संवाद योजनेस मान्यता आणि निधी मिळण्याच्या प्रस्तावावर मान्यता घेणे, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा चालवण्यासाठी पीपीपी मॉडेल राबविण्याबाबत कार्यवाही तातडीने करावी, प्रशासनाच्या हेल्पलाईनसाठी महाआयटी खासगी यंत्रणेकडून तांत्रिक सोयी-सुविधासह नियंत्रण कक्षात मनुष्यबळ उपलब्ध करावे, प्रशासनाच्या गुप्त सेवा निधीमध्ये वाढ करणे, बाह्ययंत्रणेद्वारे पदभरती, अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकटीकरण करणे, गडचिरोली तसेच इतर जिल्ह्याच्या कार्यालयाकरिता इमारत बांधकामाची सद्य:स्थिती, अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिरं अशा विविध विषयांचा आढावा मंत्री आत्राम यांनी यावेळी घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी