28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमुंबईसमीर भुजबळांचा 'मनाचा मोठेपणा'

समीर भुजबळांचा ‘मनाचा मोठेपणा’

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. प्रत्येक जण  तो आपल्या आपल्या परीने साजरा करत असतो. काही आपल्या मित्रासमवेत वाढदिवस साजरा करतात. काही कुटुंबासोबत तर अनेकजण याच दिवशी अनाथ- वृद्धाश्रम यांना  भेट देऊन तिथे आपला वाढदिवस साजरा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील व मुंबईबाहेरील अनेक अनाथ मुलांना मुंबईची सफर घडवण्यात आली.  त्याचबरोबर या मुलांच्या उपस्थितीत समीर भुजबळ यांनी आपला वाढदिवस साजरा करून या मुलांना शैक्षणिक साहित्य व विविध वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी या लहान मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. नव्हे तर या कृतीतून समीर भुजबळांच्या  ‘मनाचा मोठेपणा’ सगळ्यांना दिसला.

समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईसह महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच समीर भुजबळ यांनी आपला वाढदिवस मुंबईत साजरा केला. पक्षाला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी समीर भुजबळ मैदानात उतरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षातील मान्यवरांची उपस्थिती होती.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विभागातील कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. आगामी काळात याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही पक्ष संघटना मुंबईत मजबूत करण्याचे काम करू, ही कार्यकर्त्यांची उपस्थिती पक्षाला नक्कीच नवी उभारी देईल अशी भावनादेखील समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा 

तेजस्विनी पंडित यांचा कुणावर रोष? ट्विटर व्हेरिफिकेशन काढण्यासाठी राजकीय दबाव?
राज्यातील मुली होणार लखपती; मंत्रिमंडळ बैठकीतले ७ मोठे निर्णय
विधिमंडळ समित्यांमध्ये भाजपने बाजी मारली; भाजपला ५० टक्के, शिंदे, पवार गटाला २५: २५ टक्के वाटा !

दरम्यान, मुंबई  व मुंबईबाहेर अनाथ मुलांची संख्या मोठी आहे. यातील निम्मे मुले मिळेल ती  कामे करून आपले पोट  भरत असतात. यातील अनेक मुले ही रस्त्यावर, लोकलमध्ये भीकही मागतात. अनेक स्वयंसेवी संस्था अशा मुलांचा सांभाळ करून त्यांचे शिक्षण पूर्ण करतात. भारतात दारिद्रय रेषेखाली राहत आहेत. अनेकदा यांची मुलेही अनाथ मुलांसारखीच जगत असतात.

कोरोना काळात भारतात अनेक लहान मुळे पोरकी झाली. त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या आहेत. या मुलांचे कोणीतरी नातेवाईक असतात. पण अनाथ मुलांना तसा कोणच वाली नसतो. ही मुले लहान असताना त्यांचे आई वडील  देवाघरी गेलेले असते. त्यामुळे त्यांचे बालपण करपले जाते. अशा मुलांना चांगले नागरिक बनवण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करत असतात. बालपणापासून त्यांच्या आयुष्यात दु:ख असते. पण सोमवारी समीर भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण रिमझिमले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी