29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडासिलेसिया डायमंड लीगमध्ये अविनाश साबळे 6 व्या स्थानी, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

सिलेसिया डायमंड लीगमध्ये अविनाश साबळे 6 व्या स्थानी, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

भारताचा राष्ट्रीय विक्रम धारक अविनाश साबळेने नवी कामगिरी केली आहे. त्याने सिलेसिया डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:63 वेळेसह विश्वासार्ह सहावे स्थान पटकावले आहे. या प्रक्रियेत, तो पॅरिस ऑलिम्पिक नवीन प्रवेशी बनला आहे. 16 जुलै रोजी पोलंडच्या चोरझो येथे झालेल्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेमध्ये अविनाशने आपले नाव कोरले आहे. डायमंड लीग 2023 मधील साबळेचा हा तिसरा सामना होता आणि त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती.

डायमंड लीग फायनल 2023 च्या रनअपमध्ये साबळेने सिलेसिया येथे तीन पात्रता रॅंकिंग गुण मिळवले आणि आता सात गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. मोरोक्कोच्या रबात येथे 8:17.18 च्या वेळेसह 10 वे आणि स्टॉकहोममध्ये 8:21:88 करत पाचव्या स्थानावर राहिला आहे. पुरुषांच्या स्पर्धेत अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त आणि महिलांच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामी आणि लांब उडीपटू मारत मुरली श्रीशंकर आणि आता अविनाश साबळे हे भारतीयांच्या यादीत सामील झाले आहेत. यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. ऑलिम्पिक पात्रता कालावधी 1 जुलै 2023 रोजी सुरु झाली असून 30 जून 2024 पर्यंत सुरु राहणार आहे.

हे सुध्दा वाचा:

शरद पवारांच्या मनातलं आम्ही काय सांगावं; प्रफुल पटेलांची अगतिकता

गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बजावली अपात्रतेची नोटीस

विरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित

अविनाश साबळे हा बुडापेस्ट, हंगेरी येथे 19-24 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागातिक अजिंक्यपद स्पर्धेत दिसणार आहे. केनियाचा अब्राहम किबिवोट याने गेल्यावर्षी राष्ट्रकुल 2022 चे सुवर्णपद जिंकून 8:8:3 सह दुसरे स्थान पटकावले होते. तर मोरोक्कन विश्व आणि ऑलिम्पिक चॅम्पियन एल बक्कली सूफीनने 8:3.16 च्या विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. अविनाश साबळे यांने 3000 मी आणि 5000 मीटर स्टीपलचेस या दोन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. तो पुढील वर्षी ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना युजीन डायमंड लीगमध्ये आपला चांगला फॉर्म सुरु ठेवण्याचा विचार करेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी