31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयउदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमेय खोपकरांचं उपहासात्मक ट्वीट

उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमेय खोपकरांचं उपहासात्मक ट्वीट

टीम लय भारी

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत असतानाच पुणे दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.( Ameya Khopkar’s  tweet on Uday Samant)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेला पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.

मनसेचा आणखी एक तारा निखळला !

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?

त्यानंतर आता महाराष्ट्र मनसे नेते अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि वरूण सरदेसाई यांची भेट घेतली होती. या भेटीचा एक फोटो देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यावर आता मनसेकडून खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पोस्ट करत या भेटीवरुन सुरु असलेल्या चर्चांवर उत्तर दिले आहे. “गौप्यस्फोट!!! अभिजीत पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय.

रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

MNS leader Rupali Patil quits party

पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं),” असे अमेय खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी