31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?

टीम लय भारी

पुण्यातील मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याआधीच रूपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे(MNS dashing women leader Rupali Patil on the path of Shiv Sena)

मनसेला रामराम ठोकल्यानंतर रूपाली पाटील मनगटावर घड्याळ बांधणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रूपाली पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चिन्ह दिसत असताना रूपाली यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथमध्ये आरती करताना कॅमेऱ्यात पाहताना दिसले; नेटकऱ्यांनी फोटो शेअर करत केलं ट्रोल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी

रूपाली पाटील यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ व युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांची भेट घेतली आहे. युवासेनेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा फोटो शेअर केल्याने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रूपाली पाटील पक्षांतर्गत वादामुळे नाराज होत्या. त्यामुळे रूपाली पाटील लवकरच पक्ष सोडतील असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानूसार रूपाली पाटील यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकला आहे.

ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम, राज्य सरकारला झटका, याचिका फेटाळली, केंद्राला आदेश द्यायलाही कोर्टाचा नकार

Mayor complains to home minister against Shelar’s remarks

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी