30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयमनसेचा आणखी एक तारा निखळला !

मनसेचा आणखी एक तारा निखळला !

टीम लय भारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा आणि सदस्यपदाचाही राजीनामा दिला. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील  पक्षावर अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं दिसत होतं. मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे(MNS: Leader Rupali Patil says goodbye to the party)

यानंतर पाटील यांनी  सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स वरून मनसेच्या पदांची माहिती काढून टाकल्याचंही समोर आलं. यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागून आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

“राज ठाकरेंना  यासंदर्भात मी सर्व माहिती दिली आहे. मला कुठेतरी जायचं आहे, म्हणून मी मनसैनिकांना आणि राज ठाकरेंनी बदनाम करीन, असं होणार नाही. राज ठाकरे माझं दैवत आहे, आणि ते राहतील! माझ्यामुळे माझ्या पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना त्रास होणार असेल तर मी राजीनामा देत आहे.

रिकामटेकड्या नेत्यांमुळे मनसे सोडलं, असंही त्या म्हणाल्या.” असे वक्तव्य रुपाली पाटील यांनी पत्रपरिषदेत मनसेला रामराम ठोकत असल्याची घोषणा करताना केले.

Raj Thackeray : राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

Ex-corporator Resigns From MNS

मी शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी ज्या मुशीत वाढली आहे. जी माझी विचारसरणी आहे, त्याला अनुसरून पक्षप्रवेश करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात आहेत. उद्या पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी