31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

बाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

टीम लय भारी

मुंबई : शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणारे कायदे नरेंद्र मोदी सरकारने आणले आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, अशी संतप्त भावना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे ( Balasaheb Thorat said, Congress will strongly oppose to Farmers bills ).

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या मोदी सरकारने लोकसभा व राज्य सभेत हे कायदे मंजूर करून घेतले. शेतकरी कायद्यांवर सभागृहामध्ये चर्चा व्हायला हवी अशी सर्वपक्षीय खासदारांची मागणी होती. परंतु ही मागणी मान्य केली नाही. उलट ८ खासदारांना निलंबित करण्यात आले ( Balasaheb Thorat said, BJP suspended to 8 MPs ).

भाजपने केलेले हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपविणारे हे कायदे आहेत. बाजार समित्यांसारख्या संस्था शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत. अशा संस्थांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. परंतु या संस्था आता मोडीत निघणार आहेत ( Balasaheb Thorat attacks on BJP ).

हे सुद्धा वाचा

नरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

Corona : कोरोनाला रोखण्यासाठी लागणार ५ वर्षांचा कालावधी!

Anil Ambani : अनिल अंबानी यांनी पत्नीचे सर्व दागिने विकले; तर घरखर्चासाठी घेतले मुलाकडून कर्ज

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीमुळे मोठा दिलासा मिळायचा. परंतु येथून पुढे हे संपणार आहे. त्यामुळेच देशभरातील शेतकरी विरोध करीत आहेत. शेतकऱ्यांचा हा विरोध व आक्रोश चिंताजनक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या ठाम मागे उभे राहणार आहोत ( SpeakUpForFarmers ).

हा कायदा मोदी सरकारने मागे घेतला पाहीजे. कृषी उत्पन्न समित्यांचे बळकटीकरण झाले पाहीजे. आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहीजे. यासाठी काँग्रेसने जनआंदोलन उभे केले आहे.

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी आहे. कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असेही थोरात म्हणाले.

Mahavikas Aghadilay bhariयेथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी