31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजनरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

नरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील भाजपचे मातब्बर मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६.५५ वाजता निधन झाले. नवी दिल्लीतील लष्कराच्या इस्पितळात त्यांच्यावर गेल्या चार महिन्यांपासून उपचार सुरू होते. परंतु गेली तब्बल सहा वर्षे ते कोमातच होते ( Jaswant Singh dies at 82 ).

मूळ राजस्थानच्या असलेल्या जसवंत सिंह यांनी केंद्रात संरक्षण, अर्थ व परराष्ट्र अशा विविध खात्यांच्या मंत्रीपदावर काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवरून जसवंत सिंह यांच्या निधनाची माहिती दिली आहे ( Narendra Modi and Rajnath Singh tweeted on Jaswant Singh’s sad demise ).

जसवंत सिंह ६० च्या दशकात लष्करामध्ये अधिकारी होते. परंतु लष्करातील राजीनामा देवून ते नंतर राजकारणात सक्रीय झाले होते.

हे सुद्धा वाचा

Corona : कोरोनाला रोखण्यासाठी लागणार ५ वर्षांचा कालावधी!

Anil Ambani : अनिल अंबानी यांनी पत्नीचे सर्व दागिने विकले; तर घरखर्चासाठी घेतले मुलाकडून कर्ज

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

अटलबिहारी वाजपेयी यांचे विश्वासू साथीदार

अटबिहारी व लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत जसवंत सिंह हे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे वय ८२ होते. ‘सेप्सिस व मल्टीऑर्गन डिसपंक्शन सिंड्रोम’च्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांना जूनमध्ये लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘कोरोना’ची लागण त्यांना झालेली नव्हती, असे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात १९९६ ते २००४ या कालावधीत जसवंत सिंह यांनी विविध मंत्रीपदावर काम केले होते. जसवंत सिंह अर्थमंत्री असतानाच्या काळात ‘व्हॅल्यू ॲडेड टॅक्स’ (व्हॅट) लागू करण्यात आला होता. या करामुळे राज्यांना मोठा महसूल मिळू लागला होता. त्यांनी कस्टमचा कर सुद्धा कमी केला होता.

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पर्व सुरू झाल्यानंतर जसवंत सिंह यांना लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या सिंह यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. तेव्हापासून ते कोमामध्ये होते ( Jaswant Singh was in coma for 6 years ).

नरेंद्र मोदींनी डावललेले नेते

भारतीय जनता पक्ष ज्यांनी उभा केला अशा जवळपास सगळ्याच नेत्यांना नरेंद्र मोदी यांनी डावलले होते. यांत लालकृष्ण आडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी यांच्यासह जसवंत सिंह यांचाही समावेश आहे.

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी