34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयभाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :- देशातील राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तासभर चर्चा सुरू होती. या भेटीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. असे म्हणत  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे (BJP and NCP cannot come together Nawab Malik).

नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणे शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

मोदी हटाव देश बचाव, पृथ्वीराज चव्हाणांचा सायकल रॅलीत नारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र नवाब मलिक यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे (Nawab Malik has put an end to this discussion).

राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. शिवाय विचारसरणी वेगळी आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

BJP and NCP cannot come together Nawab Malik
नवाब मलिक

मनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

NCP, BJP can never come together: Nawab Malik on speculation of Sharad Pawar-Fadnavis meeting

आजच्या घडीला किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आलेली आहे. व्यवस्थित काम करत असताना काही लोक तारीख पे तारीख देत मी पुन्हा येईन सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे (Nawab Malik has also said that the rains will come as per the forecast of the meteorological department but the forecast is not true).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी