32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआम्हाला सुध्दा आरेला कारे करता येत; चित्रा वाघ यांचा राऊतांना इशारा

आम्हाला सुध्दा आरेला कारे करता येत; चित्रा वाघ यांचा राऊतांना इशारा

महेश कातुरे

मुंबई :-  शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध केला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे (BJP leader Chitra Wagh has warned that we too can do Aarela).

चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विट हँडलवरून ट्विट करून इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरगळा आहेत. तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते अगोदर सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे (The tiger has warned that the language of Kare can be used).

कोव्हॅक्सीनची तिसरी मात्रा आणि गरज

मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे, नाना पाटोलेंचा खोचक टोला

मुंडे भगिनी केंद्रीय भाजपवर नाराज नाहीत; उगाच त्यांना बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीस

BJP leader slams Sanjay Raut, dares him to seek ‘clarification’ from Sonia Gandhi on Waqf Board land scam

BJP leader Chitra Wagh has warned that we too can do Aarela
चित्रा वाघ आणि संजय राऊत

नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्या नंतर राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती त्यांनी असं म्हटलं होतं की,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबतही  चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलीय. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला लगावतानाच असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा टोमणा मारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी