30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयअंमली पदार्थांच्या विरोधात भाजपाची जनजागृती, तर जनजागृती केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

अंमली पदार्थांच्या विरोधात भाजपाची जनजागृती, तर जनजागृती केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

टीम लय भारी

संपूर्ण देशातील बहुसंख्य तरुणांना अंमली पदार्थ सेवनाच्या व्यसनाने विळखा घातला आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणही अजून ताजे आहे. अशा बिकट परिस्थितीत समाजातील तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या महामंत्री केतकी अरविंद सांगळे यांनी  ” SAY YES TO LIFE, NO TO DRUGS ” या अभिनव स्वाक्षरी अभियानाचे आयोजन केले होते. या स्वाक्षरी अभियानाला विक्रोळीतील तमाम तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला (BJP’s public awareness against drugs).

मात्र, विक्रोळी पोलीस ठाण्याने केतकी सांगळे आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या कलमांतर्गत नोटीस बजावली आहे. तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानासाठी विक्रोळी पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होणार !

दुनिया झुकती है.. झुकानेवाला चाहिये

BJP Ketki Sangale's  public awareness against drugs
तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून रोखण्यासाठी राबविण्यात आली स्वाक्षरी मोहीम

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्षा उद्योजिका योजना ताई ठोकळे आणि मंडळ अध्यक्ष मंगेश पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप महिला मोर्चा आणि युवा-युवती व विद्यार्थी मोर्चा यांच्या संयुक्त अभियानाने विक्रोळी येथे १८ नोव्हेंबर २०२१ रोजी स्वाक्षरी अभियान (SIGNATURE CAMPAIGN) “SAY YES TO LIFE, NO  TO  DRUGS” राबविण्यात आले. भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा पदाधिकारी व विक्रोळी विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

मात्र, विक्रोळी पोलिसांनी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानासंदर्भात भाजपच्या विधानसभा क्षेत्राच्या महामंत्री केतकी सांगळे आणि महिला मोर्चाच्या पदाधिकारी महिलांना जमावबंदीच्या कलमांतर्गत नोटीस बजावली आहे. याप्रकरणी विक्रोळीच्या तमाम नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर विक्रोळीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्मृती ईराणींचे पहिले पुस्तक प्रदर्शित

BJP will go booth to booth in Maharashtra, highlight how Uddhav govt is ‘damaging’ agencies

दरम्यान, राज्य सरकार पोलिसांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सूडबुद्धीने वागत असल्याची भावनाही केतकी सांगळे यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी