30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंना धक्का; मुंबईतील 40 वर्षे जुन्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

उद्धव ठाकरेंना धक्का; मुंबईतील 40 वर्षे जुन्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वांद्रे येथील शाखेवर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचे म्हणत शाखेवर बुलडोझर चालवला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापासून ही शाखा हाकेच्या अंतरावर आहे. पालिकेने केलेल्या कारवाईनंतर आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोठ्या पोलीस फौजफाट्यासह महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. जी शाखा आहे ती 40 वर्षे जूनी असल्याचे सांगितले जात आहे. वार्ड क्रमांक 96 चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय असून फारुख शेख हे या शाखेचे प्रमुख आहेत. ही कारवाई करत असताना असंख्य शिवसैनिक तेथे जमा झाले होते.

हे सुद्धा वाचा

WTC नंतर आता टीम इंडियाची नजर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकवर

दर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान माजी नगरसेवक हाजी हलम खान यांनी आपण 10 कोटींची ऑफर नाकारल्यामुळे ही कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत गद्दार, मिंधे सुड भावनेने कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. 1995 च्या झोपड्या अधिकृत केल्या आहेत मग 40 वर्षे जूनी असलेली शाखा अनधिकृत असल्याचे महापालिका कसे म्हणू शकते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी