31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयतब्बल अडीज महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार

तब्बल अडीज महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार

टीम लय भारी
मुंबई:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि अडीच महिन्यांनंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सार्वजनिकपणे दिसणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच उद्या उद्धव ठाकरे यांना पाहण्याची उत्सुकता लागली आहे.(C.M will attend a public function After a staggering month)

 नोव्हेंबरमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.  तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्याचा कारभार हाताळत आहेत. त्यानंतर ते सार्वजनिकपणे हजर राहिले नाहीत आणि शारीरिकरित्या झालेल्या कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा बैठकीचा भागही नव्हते. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाला ही ते उपस्थित राहू शकले नव्हते.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टिकास्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कामाचा धडाका, एकही फाईल प्रलंबित नाही

ठाकरे सरकारचे खमके पाऊल, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात आणणार ५ लाख कोटींची गुंतवणूक

“Wasted 25 Years In Alliance With BJP…,” Says Uddhav Thackeray

त्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. इतका काळ मुख्यमंत्री दिसत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज तात्पुरता दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणीही भाजपच्या नेत्यांनी केली होती.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले होते. त्यावेळी आपण लवकरच घराबाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.  शस्त्रक्रियेनंतर मंत्री प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवाजी पार्कवर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी