34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयपुण्यात एका मिशनवर आलोय; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा

पुण्यात एका मिशनवर आलोय; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा

टिम लय भारी

मुबंई : पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी करताच दुस-या दिवशी त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, असा सवाल विचारला होता. यावर चंद्रकांत पाटलांनी, ‘हुरळून जाऊ नका, पक्षाने एका मिशनवर पाठवले आहे’, असा टोला हाणला आहे.

पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील सेफ मतदारसंघ निवडल्याच्या आरोपांना नेहमी सामोरे जावे लागते. यामुळे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्षच मी कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे. यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी