30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील यांचे राहूल गांधींना आव्हान

चंद्रकांत पाटील यांचे राहूल गांधींना आव्हान

टीम लय भारी

काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. विश्वनाथ मंदिराच्या विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात  पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती(Chandrakant Patil’s challenge to Rahul Gandhi)

या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात पारा घसरण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे

भाजपाच्या १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

पाटील म्हणाले,भरभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत.एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होते,  मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी  साचते असे अनेक प्रश्न निर्माण झाले. हे सर्व  हटविण्याचा संकल्प  मोदींनी  पूर्ण केला.

आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात.

बुलढाणा, अकोला,वाशिममध्ये भाजपचा विजय

Maha Legislative Council results exhibit people’s faith in PM: Nadda

केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भाजपाचे खासदार चंद्रकांत पाटील यांनी राहूल गांधी यांना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी