30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय40 पेक्षा अधिक आमदार बैठकीला उपस्थित; छगन भुजबळ यांचा दावा

40 पेक्षा अधिक आमदार बैठकीला उपस्थित; छगन भुजबळ यांचा दावा

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मात्र, जसजसे भाषणं होतील तसतसे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. आज ४० पेक्षा अधिक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही वाहतूक कोंडीत अडकले, काही परदेशात अडकले, तर कुणी आजारी आहे. या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. असा दावा अजित पवार गटातील बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवारांच्या गटाला नियुक्त्यांचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आता अजित पवार गटातील बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी आम्हालाही कायदे कळतात असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटांकडून बुधवारी (५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. बांद्रा येथे अजित पवार गटाची सभा सुरू असून त्यावेळी भुजबळ बोलत होते. सकाळी उठलो आणि चला चला मंत्रीपदाची शपथ घेऊ असं नाही. सगळा विचार झाला आहे. असं नाही की, सकाळी उठलो आणि चला चला मंत्रीपदाची शपथ घेऊ. काय प्रक्रिया आहे, काय कायदे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे काय निकाल आहेत या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचललं आहे. हे म्हणतात तुमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत का, तुमच्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत का, आमदार आहेत का. हे सभागृह तुडुंब भरलं आहे, पाठीमागे जागा नाही आणि बाहेर वाहतूक कोंडी झालीय इतकी गर्दी आहे, असंही भुजबळांनी नमूद केलं.

हे सुद्धा वाचा:

सध्याचे राजकारण पाहता लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये; काय म्हणाले रोहित पवार वाचा

‘ गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा’, शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी

धक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

90 च्या दशकात शिवसेना फार्मात असताना छगन भुजबळ काही आमदार घेऊन कोंग्रेसमध्ये गेले होते. तेव्हा त्यांच्या जीवाला धोका असल्याचे निदर्शनास येताच शरद पवार यांनी भुजबळ यांना संरक्षण तर पुरवलेच शिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना गृह, सार्वजनिक बांधकाम अशी मलईदार खात्यांचे मंत्रीही केले. स्टंप पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याने भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण भुजबळ यांच्या डोक्यावर पवार यांचा हात असल्याने त्यांचा बळ बाका झाला नाही. असे हे पवार यांच्या विश्वासातील भुजबळ आता पवार यांच्या विरोधात बोलत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी