33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयअडीच वर्ष घरी बसलेल्यांनी सुटीवर गेल्याची ओरड करू नये; मुख्यमंत्र्यांचा टोला

अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी सुटीवर गेल्याची ओरड करू नये; मुख्यमंत्र्यांचा टोला

महाराष्ट्रातील सत्ताकारी बदलाच्या आणि नवीन राजकीय घडामोडी दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्चर्यकारकपणे तीन दिवसांची तातडीची रजा घेतल्याने एकच खळबळ उडाली. शिंदे यांनी कोणतीही अधिसूचना न देता अचानकपणे गावी गेल्याने राजकीय खलबते सुरू झाले. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, मी इथे लपून नाही. महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या दुर्गम भागातील विकासकामांचे भूमिपूजन करत आहे. अफवा पसरवणे हे विरोधकांचे कामच आहे, परंतु माध्यमांनी तरी याची खातरजमा करायला हवी, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे.

शिंदे हे दोन दिवसांपासून त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले आहेत. ग्रामस्थांशी संवाद करत आहे, जाहीर कार्यक्रम सुरू आहेत, प्रशासनाबरोबर बैठका होत आहेत, गावातील उत्सवात सहभागी होत आहे तरीही कुणाला तरी मी सुटीवर गेल्याचा भास होतो. तसे ते आवई उठवतात आणि माध्यमेदेखील त्यावर चर्चा करू लागतात, हे सगळेच हास्यास्पद आहे. मी सुटीवर नाही तर उलट डबल ड्युटीवर आहे. पदावर असताना जनतेची जबाबदारी सोडून अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी सुटीवर गेल्याची ओरड करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सुट्टीवर; गावी जाऊन पूजा घालणार?

ठाण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा 4 कोटींचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर!

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

CM Eknath Shinde in Mahabaleshwar on double duty

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी