29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सुट्टीवर; गावी जाऊन पूजा घालणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सुट्टीवर; गावी जाऊन पूजा घालणार?

महाराष्ट्रातील सत्ताकारी बदलाच्या आणि नवीन राजकीय घडामोडींच्या चर्चा दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्चर्यकारकपणे तीन दिवसांची तातडीची रजा घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे अचानकपणे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी रवाना झाल्याने आता पुन्हा राजकीय खलबते सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा अनधिकृत रजेवर जाण्याचा कोणताही विचार नव्हता, परंतु मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठका घेतल्यानंतर अचानक आपण सातारा येथील आपल्या गावी रवाना होत असल्याचे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. 24 ते 26 एप्रिल या कालावधीत शिंदे रजेवर राहणार आहेत. मात्र महाराष्ट्रात राजकरणाचं एवढं भिजत घोंगड असताना, मुख्यमंत्री गावाला जाऊन काय पूजेचा थाट घालणार आहेत का? असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे.

“महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या रजेवर आपल्या गावी गेले, हे खरंच आश्‍चर्यकारक आहे. भाजपच्या अजेंड्यावर आणि योजनेवर तंतोतंत काम करत असताना राज्यात वेगवेगळ्या राजकीय जुळवाजुळवासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी पडद्याआड चर्चा केली. अशा वेळी राजकीय घडामोडी सुरू होतील, अशी अपेक्षा त्यांना नव्हती, असे शिंदे गटातील एका प्रतिनिधीने सांगितले.

हे सुद्धा वाचा: 

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का?

भाजप-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणाने शिंदे गट अस्वस्थ!

CM Eknath Shinde on 3 days leave; Shinde went to Satara village

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी