33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयठाण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा 4 कोटींचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर!

ठाण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा 4 कोटींचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर!

गतवर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि राज्यात पक्षांतर होऊन शिंदे-भाजप यांची युती झाली. मात्र असे असले तरी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही पक्षात परिस्थिती फारशी आलबेल नसल्याने आता ठाण्यावरची पकड कायम ठेवण्यासाठी शहरात मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयात पालिका आयुक्तांच्या कार्यालयाचाही समावेश करण्यात आला असून ठाणे महापालिकेच्या कारभारावर तसेच ठाण्यात सुरु असलेल्या विकासकामांवर थेट मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे. याचा फायदा त्यांना महापालिकेच्या निवडणुकीतही होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिकेने यासंदर्भात एक निविदा प्रसिद्ध केली असून ही निविदा फर्निचरच्या कामांसाठी काढण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निविदेमध्ये मुख्यमंत्री कार्यालय असा उल्लेख असल्याने लवकरच ठाण्यात हे मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

वागळे इस्टेट येथे असलेल्या शासकीय कृषी विभागाच्या कार्यालयाची जागा क्लस्टर नियोजनासाठी वापरण्यात येणार असल्याने तात्पुरते कृषी विभागाचे कार्यालय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या नगर अभियंता यांच्या वतीने बांधकाम व फर्निचरची मुख्यमंत्र्यांसह कृषी विभागाचे कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 4 कोटी 60 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. 3 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निविदा भरता येणार असून ते 8 मे रोजी ती उघडली जाणार आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे आहेत. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांचे कार्यालय एकाच मजल्यावर असणार आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या कारभारावर शिंदे यांची पकड कायम राहणार आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत मिळू शकेल, अशी चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सुट्टीवर; गावी जाऊन पूजा घालणार?

ठाणेकरांनी पळविले मुंबईचे पाणी; वागळे इस्टेट बोगदा कांड : जितेंद्र आव्हाड

CM office in Thane, BMC, CM office in Thane will cost 4 crore 60 lakhs to municipal corporation, EKNATH SHINDE, BJP, SHIVSENA

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी