33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमहत्वाची बातमी : काँग्रेसची दिल्लीत, तर राष्ट्रवादीची मुंबईत तातडीची बैठक

महत्वाची बातमी : काँग्रेसची दिल्लीत, तर राष्ट्रवादीची मुंबईत तातडीची बैठक

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  शिवसेनेला पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत तातडीची बैठक आयोजित केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक आयोजित केली आहे. या दोन्ही बैठका थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजण्याच्या सुमारास होणार आहेत.

सोनिया गांधी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीला जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रातील नेते जयपुरमध्ये आहेत. तेथूनच मल्लिकार्जून खर्गे, बाळासाहेब थोरात व अन्य काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीदरम्यान सोनिया गांधी व शरद पवार फोनवरून संवाद साधतील. शिवसेनेला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत यावेळी चर्चा होईल. शिवसेनेने एनडीएसोबतचे सगळे संबंध तोडून टाकावेत. केंद्र सरकारमधून बाहेर पडावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसने अट घातली होती. त्यानुसार शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असेल. पाठिंबा दिल्यानंतर सरकार कसे असेल. त्याबाबतचा किमान समान कार्यक्रम काय असेल याची चर्चा आजच्या बैठकीत होईल.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, याचा विनोद तावडेंना आनंद, मनसेने उडविली खिल्ली

शिवसेना, काँग्रेसमध्ये आमदारांच्या सह्यांची मोहिम, शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण

बैठकीनंतर शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी पाठिंबा देण्याबाबतच्या आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र काँग्रेस व राष्ट्रवादीकडून राज्यपालांना दिले जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी