34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयCovid19 : काँग्रसचे भाजपला आवाहन; हात जोडतो पण जातीयवादी राजकारण थांबवा

Covid19 : काँग्रसचे भाजपला आवाहन; हात जोडतो पण जातीयवादी राजकारण थांबवा

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या ( Covid19 ) संकट काळातही केंद्रातील मोदी सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन प्रचंड बेफीकीरी दाखवली. त्याचे दुष्परिणाम इतर राज्यांबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तबलिगी समाजाचा दिल्लीतील कार्यक्रम व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या भूमिकेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते अतिशय गंभीर आहेत त्याची उत्तरे भाजपाने द्यावीत, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

गेल्या सहा वर्षातील भाजपच्या बेफिकीर कारभारामुळे देश पाठी गेला असून या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी हे अशाच बेफीकीरीचे प्रतिक आहे. असे असतानाही तबलीगचा वापर करून भाजप ( Covid19 ) जातीयवादाचे राजकारण करीत आहे. कृपा करून हे जातीयवादी राजकारण थांबवा अशी हात जोडून विनंती असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सावंत पुढे म्हणाले की, तबलिगी जमातने महाराष्ट्रातही संमेलन घेण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतु कोरोना ( Covid19 ) संकटाची जाण ठेवून महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रचंड धोका टळला. मात्र दिल्लीत होणाऱ्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. ज्या दिवशी केंद्राने तबलिकींच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती, त्याच दिवशी केंद्राने एक पत्रक काढले होते. कोरोना ( Covid19 ) ही आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी नाही असा निर्वाळा दिला होता.

संसदेचे कामकाजही केंद्र सरकारने तसेच पुढे रेटले होते. दिल्ली पोलिसांना तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाची अधिकृत परवानगी नाकारता आली असती. त्याचबरोबर तिथे किती लोक आहेत, कोण परदेशातून आले याची इत्यंभूत माहिती त्यांना होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तेथे गेले तेव्हा हे स्पष्ट होते. त्यामुळे ही बेफिकीरी जाणीवपूर्वक राजकारण करण्याकरता केली का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ज्या पद्धतीने भाजपाकडून कोरोनाचा ( Covid19 ) विषय हा हिंदू – मुस्लीम अशा पद्धतीचे धृवीकरण करण्यासाठी केला जात आहे त्यातून ही शंका अधिक गडद होत आहे. खरे तर महाराष्ट्रातील जनतेवरचा धोका अधिक वाढवण्याचे पाप हे केंद्र सरकारने केले आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारचा दोष असताना किरीट सोमय्यांसारखे भाजपा नेते राज्यपालांकडे जाऊन अशा संकटाच्यावेळी राज्यात तबलिगी जमातबद्दलची माहिती मागतात. त्यावेळेस कोरोनाबरोबरच समाजात जातीयवादी व्हायरस पसरवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असे दिसते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत देश जात असताना तरी जातीयवादाच्या हीन राजकारणाचा त्याग करावा असे सावंत यांनी म्हटले आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण तो महाराष्ट्रासाठीच वापरणार का ?

Covid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार

WHO ने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी