29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 अबब ! धर्मांध, खोटे मेसेज पाठविल्याप्रकरणी १३२ गुन्हे दाखल, ३५ जणांना...

Covid19 अबब ! धर्मांध, खोटे मेसेज पाठविल्याप्रकरणी १३२ गुन्हे दाखल, ३५ जणांना अटक

टीम लय भारी

मुंबई  :  कोरोनाच्या ( Covid19 ) आपत्ती काळात वॉट्स अप, फेसबुक अशा सोशल मीडियावर धार्मिक विद्वेष, अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात तब्बल १३२ गुन्हे दाखल झाले आहेत. यात नवीन १९ गुन्ह्यांचा समावेश आहे. ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर पोलिसांनी हे सगळे गुन्हे दाखल केले आहेत.

‘कोरोना’च्या ( Covid19 ) पार्श्वभूमीवर गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे.

सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष

सध्या कोरोनाच्या ( Covid19 ) पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या महाराष्ट्र सायबर शाखेने आता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासोबतही सायबर शाखेने समन्वय साधला आहे. अशा समाजकंटकांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई हाती घेण्यात आल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्यात आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीडमध्ये १६, कोल्हापूर १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, जालना ८, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६, नागपूर शहर ४, नाशिक शहर ५, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३, रत्नागिरी ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, उस्मानाबाद १,हिंगोली १ यांचा समावेश आहे .

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक  व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ३५ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे .

राज्यात काल कोल्हापूर, बीड , जालना , हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी आपल्या फेसबुक, व्हाट्सअँप व अन्य सोशल मीडियाचा (social media ) वापर करून कोरोना महामारीला ( Covid19 ) धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या आहेत.

सध्या या लॉकडाऊनच्या ( Covid19 ) काळात काही नवीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर करताना बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो. मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितला जातो. ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स, क्रेडिट / डेबिट कार्डची सर्व माहिती विचारली जाते. त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा otp कन्फर्म ( confirm ) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो .

सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नये. असा प्रकार घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. शिवाय सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी, असे सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

‘कोरोना’ व्हायरस ( Covid19 ) संदर्भात अफवा पसरविणे, खोटी / चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे असे सायबर शाखेने आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही ( Covid19 ) अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : काँग्रसचे भाजपला आवाहन; हात जोडतो पण जातीयवादी राजकारण थांबवा

PoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महानंद, नागपूर, धुळे, वसई – विरारला नवे अधिकारी

WHO ने प्रसारित केलेली माहिती

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी