30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयप्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का? स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंतचा सवाल

प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का? स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंतचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सतत ठाकरे सरकारवर आरोप करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) असेच ट्वीट केले होते. त्याला कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उत्तर दिले. पण दरेकरांनी ट्वीट डिलीट केले का? असा प्रश्न सचिन सावंत यांनी स्क्रीनशॉट शेअर करून विचारल (This question was asked by Sachin Sawant by sharing a screenshot).

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या मुद्द्यावरून राजकारणही तापले असून, केंद्र आणि राज्य असे दावे प्रतिदावे केले जात आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाष्य केले होते. त्याला प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उत्तर दिले. प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) केलेले ट्विट रिट्विट करत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांना व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू,” असे सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले होते. सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या ट्विटनंतर प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले.

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

प्रियांका गांधीची लसीवरून केंद्र सरकारवर बोचरी टिका

Coronavirus: ‘You have a five-year plan,’ HC pulls up Gujarat on vaccination pace of 18-45 age group

डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रश्ननही उपस्थित केला. “हे ट्विट माझ्या उत्तरानंतर सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी डिलीट केले का?,” असे सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलेले मूळ ट्विट त्यांच्या सोशल हॅण्डलवर दिसत नाही. ते त्यांच्या सोशल हॅण्डलवरून हटवण्यात आले आहे.

 दरेकर काय म्हणाले होते?

“‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’, अशी गत सध्या सचिन सावंत (Sachin Sawant) यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात. मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका. आरक्षण वाचवणे जमले नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा,” असे प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी डिलीट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी