30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शाह यांच्यासोबत अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली होती, पण आश्वासन दिले...

अमित शाह यांच्यासोबत अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली होती, पण आश्वासन दिले नव्हते : नितीन गडकरी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  आमचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी मी बोललो. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काही बोलणे झाले होते का, असे मी त्यांना विचारले. त्यावर अमित शाह म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 50:50 टक्के फॉर्म्यूलावर चर्चा झाली होती. त्यानंतर अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा शिवसेनेने मांडला होता. यावर आपण निवडणुकीनंतरच बोलू, असे उद्धव ठाकरे यांना शाह बोलले होते. मुख्यमंत्रीपदाबाबत शाह यांनी शब्द दिला नव्हता, असे स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना केले आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत चर्चा व्हायच्या. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जाहीर भूमिका घेतलेली होती. उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असे म्हटले होते. असे असेल तर मग महायुतीला अर्थ राहात नाही. भाजप व शिवसेना ही भारतातील सर्वात दीर्घकाळ टिकलेली महायुती आहे. हिंदुत्व व महाराष्ट्राचे हित हा आमच्या महायुतीमधील समान धागा आहे. मी शिवसेना व भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे. मार्ग काढण्याचा जरूर प्रयत्न करेन. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. युती ठेवायची किंवा तोडायची हा त्यांचा निर्णय आहे. पण केवळ सत्तेसाठी दुसऱ्या पक्षांसोबत अलायन्स करणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणाविरोधात आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत त्यांनी असे कधी केले नाही. अलायन्स म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढविल्या होत्या. अजूनही वेळ गेलेली नाही. यातून मार्ग निघू शकेल, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी