30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअमोल कोल्हे यांची घरवापसी; चोवीस तासाच्या आतच शरद पवारांकडे

अमोल कोल्हे यांची घरवापसी; चोवीस तासाच्या आतच शरद पवारांकडे

आपल्या अमोघ वकृत्वाने, विविधांगी अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यांतील ताईत झालेले आणि राष्ट्रवादीचा लोकसभेतील खणखणीत आवाज म्हणून ओळखले जाणारे खासदार अमोल कोल्हे यांनी घरवापसी केली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रविवारी अजित पवार यांच्या सोबत असल्याचे बोलले जात होते. अजित पवार यांनीसुद्धा शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याला सर्वांचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते पण अमोल कोल्हे यांनी 24 तासाच्या आतच पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणे पसंत केले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करत अजित पवार यांच्या गटाला धक्का दिला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।” आणि हॅशटॅग मी साहेबांसोबत अस ट्वीट केल आहे. त्यामुळे कोल्हे यांनी अजित पवार यांना पाठिंबा देणे सरळसरळ अमान्य केले आहे. कोल्हे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ‘साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण’ तर ज्योतिषी कधी सगळे विसरायच पण बाप नाही विसरायचा. असे बोल या व्हिडिओ आहेत. त्यामुळे कोल्हे यांनी ते अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहेत हे स्पष्ट केले आहे. दरम्यान शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती अस प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून हाकलले; पवारांनी सोडले ब्रह्मास्त्र

मनसेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

शपथविधीला उपस्थित राहणे राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना महागात पडले; सर्व नेते बडतर्फ

अमोल कोल्हे हे शिरूर मतदार संघात खासदार आहेत. शिरूर मतदार संघ हा शरद पवारांच्या भावकीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पूर्वी या मतदार संघात शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील हे खासदार होते त्यांचा दणदणीत पराभव करत कोल्हे विजयी झाले होते. कोल्हे हे आक्रमक भाषणशैलीसाठी आणि त्यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील भूमिकेसाठी घराघरात पोहचले आहेत त्यांच्या या प्रसिद्धीचा फायदा राष्ट्रवादीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी