30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर ईडीचे छापे

आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर ईडीचे छापे

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या अनियमिततेची एसआयटी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर ईडीची पीडा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला त्रासदायक ठरणार हे सिद्ध झाले होते. त्यानुसार मुंबई महापालिका कोविड घोटाळ्यासंबंधी मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तसेच खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानंच सुजीत पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं कंत्राट मिळवलं. तसेच यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणा संदर्भात ईडीनं चौकशी केली होती. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे. कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कोविड काळात दिले गेलेल्या कंत्रांटांसंदर्भात छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथे असंच एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं.

माहितीनुसार, हे कोविड सेंटर 242 ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आलं होतं. तिथे, दहिसर केंद्रात आणखी 120 रेग्युलर बेड होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कंत्राट मिळालं होतं. ते चालवण्यासाठी जून 2020 मध्ये डॉक्टरांशी करार करण्यात आला आणि बीएमसीनं कंत्राट दिलं. त्यांच्या घरावर छापा टाकताना अंमलबजावणी संचालनालयाला एक कागद सापडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. याच आधारे असा आरोप केला जात आहे की, कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर आणि कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीसोबत करार करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

हरीनामच्या गजरात निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोलापूरकडे मार्गक्रमण, मुक्ताबाईंची पालखी भूम मुक्कामी

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी राहा; योग दिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

टक्केवारी खाणारा कारकून; छापेमारीनंतर अमेय घोलेंचं खरमरीत ट्वीट


शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा कारकून, असा उल्लेख करत अमेय घोले यांनी सूरज चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर अमेय घोले यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “ज्या कारकुनाच्या घरी छापा पडला, त्याला बरोबर ठराविक बैठीकीआधी, Acres Club चेंबूर येथे किती कंत्राटदार भेटायला येत होते आणि ह्याचे त्यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, ह्याचीसुद्धा चौकशी व्हावी.” तसेच, पुढे ट्वीटमध्ये अमेय घोलेंनी म्हटलं आहे की, “शिवसैनिकांना मिळालेल्या कामाची टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनावर, जर शिवसेनेसाठी जीव झोकून देणारे निम्म्याहून अधिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक नाराज आहेत, तर ह्यामागची कारणं ही तितकीच गंभीर असावीत.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी