33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयएकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपमध्येच राहणार

एकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपमध्येच राहणार

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : एकनाथ खडसे भाजपमध्ये कमालीचे नाराज आहेत. ते लवकरच भाजपमधून बाहेर पडतील. ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असे अंदाज बांधले जात होते. परंतु आपण भाजपमधून बाहेर पडणार नाही, असे स्पष्टीकरण स्वतः खडसे यांनीच दिले आहे.

खडसे आज नागपूरला आले होते. शरद पवार सुद्धा आज नागपूरमध्येच होते. त्या पार्श्वभूमीवर खडसे हे पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मी भाजपमध्येच राहणार आहे. मी अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी पक्षात कोणावरही नाराज नाही. मी वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात आहे असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे खडसे यांचे बंड तूर्त तरी थंड झाल्याचे दिसत आहे.

गेल्या पंधरवड्यापासून पंकजा मुंडे व एकनाथ खडसे दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपमधील काही नेतेच कारणीभूत असल्याचाही एकनाथ खडसे यांनी आरोप केला होता.

भाजप बिकट स्थितीमध्ये असताना तो आम्ही वाढवला. त्यासाठी कष्ट उपसले. परंतु पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार ज्या नेत्यांकडे आहेत, त्यांच्याकडून अन्याय होत असल्याचाही आरोप खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर काही दिवसांपूर्वी ते शरद पवार व उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर भाजपमधून ते लवकरच बाहेर पडतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ते आज नागपुरला आल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा रंगली होती. आपण शरद पवार, उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. परंतु माझ्या वैयक्तिक कामानिमित्त ही भेट आहे, असे खडसे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल : ‘यांच्या’ निर्णयामुळे पक्षाचे नुकसान

नागरिकत्व कायद्याविरोधात पुणे विद्यापीठात ‘मशाल मार्च’, सत्यजित तांबे सहभागी होणार

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी