29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रनागरिकत्व कायद्याविरोधात पुणे विद्यापीठात ‘मशाल मार्च’, सत्यजित तांबे सहभागी होणार

नागरिकत्व कायद्याविरोधात पुणे विद्यापीठात ‘मशाल मार्च’, सत्यजित तांबे सहभागी होणार

लय भारी न्यूज नेटवर्क

पुणे : ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’च्या विरोधात देशभर आंदोलनाचा भडका उडाला आहे. देशभरातील जवळपास ५० शैक्षणिक संस्थांमध्येही जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही आज सायंकाळी ५.३० वाजता आंदोलन पुकारले आहे.

‘मशाल मार्च’ काढून पुणे विद्यापीठातील विद्यार्थी केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याच्या भाजपच्या धोरणाविरोधात लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. मी सुद्धा सहभागी होणार असल्याचे ट्विट युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जोरदार आंदोलन झाले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्याचे पडसाद देशभरातील अनेक विद्यापीठे व शिक्षण संस्थांमध्ये उमटले आहेत. अगदी जर्मनीमध्येही या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या कायद्याविरोधात सामान्य लोकांकडून तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात, आयआयटी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतही आंदोलने करण्यात आली होती. आता पुणे विद्यापीठातही त्याचे पडसाद उमटले आहेत.

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

नागपूरच्या महापौरांवर गोळीबार, अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे हल्ला झाल्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

मंत्रीमंडळाला अंधारात ठेवून उच्च शिक्षण विभागात भरतीचा घाट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी