32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeमुंबईVedanta Foxconn Project : 'वेदांता प्रकरणात पेंग्विनसेनेकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'

Vedanta Foxconn Project : ‘वेदांता प्रकरणात पेंग्विनसेनेकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

दांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा पहिला आवाज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उठवला, त्यानंतर राज्यातील राजकारणच ढवळून निघाले. या सगळ्या वादावादीच्या प्रकरणात भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी शिवसेनेला चांगलेच फटकारले आहे. सदर प्रकरणी केवळ भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद करीत त्यांनी प्रत्युत्तर केले आहे. 

राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावरून सत्ताधारी आणि विरोधक आता आमने – सामने आले आहेत. सत्ताधारी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला म्हणून धन्यता मानत या निर्णयाची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे, तर एवढा मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातून गेला म्हणून विरोधीगटातून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा पहिला आवाज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उठवला, त्यानंतर राज्यातील राजकारणच ढवळून निघाले. या सगळ्या वादावादीच्या प्रकरणात भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी शिवसेनेला चांगलेच फटकारले आहे. सदर प्रकरणी केवळ भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद करीत त्यांनी प्रत्युत्तर केले आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, वेदांता प्रकरणात मराठी माणसांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम पेंग्विनसेनेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलं जात आहे, त्यामुळे आमचे सवाल थेट पेंग्विनसेनेला आणि पेंग्विनसेनेच्या प्रमुखांना आहेत असे म्हणून त्यांनी शिवसेनेवर, युवासेनेवर निशाणा साधला आहे. या प्रकल्पावर बोलताना आशिष शेलार म्हणतात, वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये खेचून नेला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला गेला होता, असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसत आहे असे म्हणून त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

पुढे आशिष शेलार म्हणतात, तरी पण आमचा प्रश्न असा आहे की, हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी आला होता? त्या प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण कधी केलं होतं? तुमच्या सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? महाराष्ट्रात खोटं सहन केलं जाणार नाही अशी प्रश्नांची सरबत्ती करीत शेलार यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने विरोधकांची नाराजी झाली आहे, त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे, यावर सुद्धा आशिष शेलारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा…

Vedanta Foxconn Project : वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घातले, महाराष्ट्राला पुन्हा लाल गाजर दाखवले

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची झोप ठरतेय कुतुहलाचा विषय!

Uday Samant : उदय सामंतांच्या ताफ्यात 19 मातब्बर अधिकारी!

आशिष शेलार यावेळी म्हणाले, ‘केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही आणि बाळासाहेब व आनंद दिघे यांचा एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्ही त्याला बदनाम करत आहात. त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पेंग्विनसेना उत्तर देणार नसेल तर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,’ असे म्हणून त्यांनी थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रामधील प्रकल्प आम्ही बाहेर नेला नाही, असं ते म्हणाले आहेत. तसंच दोन वर्ष महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारकडून वाटाघाटीची मागणी झाल्याने तर हा प्रकल्प आपल्यापासून दूर गेला नाही, अशी आम्हाला शंका आहे असे म्हणून त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ट्विट करीत याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये अग्रवाल लिहितात,  गुजरातने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आम्ही काही महिन्यांपूर्वी गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. सध्या आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अग्रवाल यांच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा वाद थांबलेला नाही, त्याउलट आणखी वाद विकोपास गेला असून विरोधक – सत्ताधारी एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहेत, त्यामुळे या संपुर्ण पार्श्वभूमीवर हा वाद कधी शमणार हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी